T20 WC 2021 : फटाके तर फोडू शकला नाही, मग आता टी.व्ही फोडा; भारत-पाक हाय होल्टेज सामन्याआधी व्हिडिओ लाँच


मुंबई : आजपासून १० दिवसांनी देशभरातील रस्ते पुन्हा एकदा निर्जन होणार आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा ‘कर्फ्यू’ लागू होणार आहे. त्याला कारण आहे क्रिकेट. टी-२० विश्वचषक स्पर्धेला काही दिवसांत सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे आमनेसामने येणार आहेत. सामन्याला १० दिवसांचा कालावधी शिल्लक असला तरी आतापासूनच चाहत्यांना या सामन्याचे वेध लागले आहेत. या सामन्याची तिकिटेदेखील एका तासाच्या आत विकली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ‘मौका-मौका’ जाहिरातीचा पूर्ण व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. आणि नेहमीप्रमाणे मौका-मौका ही जाहिरात तितकीच दमदार बनविण्यात आली आहे. या जाहिरातीचा प्रोमो रिलीज होताच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

वाचा-IPL फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा पराभव निश्चित; या एका गोष्टीचे धोनीकडे उत्तर नाही

या नवीन जाहिरातीमध्ये विशेष काय आहे?
नव्या मौका-मौका जाहिरातीत, एक पाकिस्तान क्रिकेट संघाचा चाहता दुबईतील एका इलेक्ट्रॉनिक्स शोरूममध्ये फटाके घेऊन जाताना पाहायला मिळत आहे. हे शोरुम एका भारतीयाचं असून ते दोघे एकमेकांचे मित्र आहेत. पाक संघाचा चाहता भारतीय संघाच्या चाहत्याला एक मोठा टीव्ही दाखवायला सांगतो. यावेळी पाक संघाचा चाहता त्यांच्या संघाच्या मजबूत फलंदाजीबद्दल सांगत असतो. पाकिस्तानी चाहता म्हणतो की, यंदा बाबर आझम, मोहम्मद रिझवान दुबईत असे षटकार मारतील की दिल्लीतील आरसे फुटतील. संधी हिरावूनच जाणार.

वाचा-बाद झाल्यानंतर पुन्हा मैदानात आला आणि दोन षटकार मारले, पाहा काय झाले

यावेळी दुकानातील एक कर्मचारी दोन टी.व्ही. घेऊन त्यांच्यासमोर येतो. ते पाहून पाकचा चाहत्याला आश्चर्य वाटतो. यानंतर, भारतीय दुकानदार पाक चाहत्याला म्हणतो, ‘टी-२० विश्वचषकात तुम्ही आमच्याकडून पाच वेळा हरला आहात. आतापर्यंत फटाके फोडू शकला नाही. मग आता काहीतरी फोडायला पाहिजे ना. एक विकत घ्या, त्याच्यावर दुसरा मोफत मिळवा.’

वाचा- IPLच्या इतिहासातील सर्वात थरारक ४ षटके; पुण्याच्या क्रिकेटपटूने केली कमाल

विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तानविरुद्ध अजिंक्यच
टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने भारताला कधीही पराभूत केले नाही. २००७ च्या टी-२० विश्वचषकात, पाकिस्तानचा संघ भारताकडून बॉल आऊटमध्ये पराभूत झाला आणि त्यानंतर अंतिम सामन्यात टीम इंडियाने ५ धावांनी सामना जिंकला होता. २०१२ च्या टी-२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानचा ८ गडी राखून पराभव केला. २०१४ च्या टी-२० विश्वचषकात भारताने ७ गडी राखून सामना जिंकला. त्यानंतर २०१६च्या टी-२० विश्वचषकात भारताने कोलकात्यात पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: