कोल्हापूर: पत्नीने मारहाण करून पतीला केलं जखमी; कारण समजल्यावर बसेल धक्का!


हायलाइट्स:

  • पत्नीने पतीला मारहाण करून जखमी केलं
  • कोल्हापूर शहरातील सदर बाजारातील घटना
  • शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

कोल्हापूर : किरकोळ वादानंतर पत्नीने पतीला मारहाण करून जखमी केलं आहे. ही घटना कोल्हापूर शहरातील सदर बाजारातील बिराजदार गल्लीत घडली असून या प्रकरणी गुन्ह्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.

विजय बसप्पा बिराजदार (वय ३९) हे फुलांचे गजरे विक्री करुन उदरनिर्वाह करतात. त्यांची पत्नी सुनीता बिराजदार या घरी दसऱ्यासाठी कडाकण्या करत होत्या. बुधवारी रात्री विजय घरी आल्यावर त्यांनी ‘मला झोपायचे आहे. तुमचं कडाकण्याचे साहित्य बाजूला ठेवा’ असं सांगितलं. यावर त्यांच्या पत्नीने ‘तुम्हाला मी कडाकण्या करत आहे हे दिसत नाही का?’ असं प्रत्युत्तर दिल्यावर दोघांमध्ये वाद झाला.

लग्नासाठी दबाव आणणे हा गुन्हा नाही; आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा रद्द

यावेळी चिडलेल्या सुनीता यांनी पतीला शिवीगाळ केली आणि अंगावर धावून गेल्या. तसंच पोळपाट आणि लाटणे डोक्यात मारुन त्यांना जखमी केले. या घटनेत विजय बिराजदार यांच्या डोक्याला जखम झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले.

दरम्यान, या प्रकरणी पती विजय यांनी पत्नी सुनीता यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून या घटनेत अधिक तपास सुरू आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: