IPLमध्ये जे मुंबई इंडियन्स सोबत झाले तेच वर्ल्डकपमध्ये भारतीय संघासोबत होणार


नवी दिल्ली: आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धा तोंडावर आली आहे. भारताने मुख्य संघात एक बदल केला आहे. फिरकीपटू अक्षर पटेलच्या जागी जलद गोलंदाज शार्दुल ठाकूरचा मुख्य संघात समावेश करण्यात आला आहे. या बदलाचे खरे कारण म्हणजे हार्दिक पंड्याला गोलंदाजी करता येत नाही हे आहे. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक वर्ल्डकपमध्ये गोलंदाजी करणार की नाही याबाबत चर्चा सुरू आहे. त्याला वर्ल्डकपमध्ये गोलंदाजी करता यावी म्हणूनच आयपीएलमध्ये त्याने गोलंदाजी केली नाही अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात आता वेगळीच माहिती समोर येत आहे.

वाचा- IPLच्या इतिहासातील सर्वात थरारक ४ षटके; पुण्याच्या क्रिकेटपटूने केली कमाल

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आगामी टी-२० वर्ल्डकपमध्ये हार्दिक पंड्या गोलंदाजी करणार नाही. संघात त्याचा समावेश एक फलंदाज म्हणून करण्यात आला आहे. जर स्पर्धा सुरु झाल्यावर तो पूर्णपणे फिट झाला तर गोलंदाजी करू शकले. फिटनेसच्या कारणामुळेच आयपीएलमध्ये हार्दिकने गोलंदाजी केली नव्हती. वर्ल्डकपसाठी संघाची निवड झाल्यानंतर निवड समितीला याची जाणीव झाली की संघात एका जलद गोलंदाजीची कमी आहे. हार्दिक गोलंदाजी देखील करतो. त्यामुळे संघात एका ऑलराउंडरची गरज होती, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

वाचा- IPL फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा पराभव निश्चित; या एका गोष्टीचे धोनीकडे उत्तर नाही

अक्षर पटेलच्या बाबत वाईट वाटते, पण संघाचे संतुलन ठेवण्यासाठी त्याला बाहेर ठेवावे लागले आणि शार्दुलचा समावेश करावा लागला. अक्षरला राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे. जर रविंद्र जडेजाला दुखापत झाली तर तो पुन्हा मुख्य संघात येऊ शकतो. जोपर्यंत जडेजा संघात आहे तोपर्यंत अक्षरची गरज असणार नाही.

वाचा- T20 WC 2021 : फटाके तर फोडू शकला नाही, मग आता टी.व्ही फोडा

गेल्या काही महिन्यांपासून हार्दिक पंड्या खराब फॉर्ममध्ये आहे. ना त्याने गोलंदाजी केली आहे ना त्याला धावा करता आल्या आहेत. आयपीएलच्या १४व्या हंगामातील १२ सामन्यात त्याने १४.११च्या सरासरीने ११२ धावा केल्या आहेत. संपूर्ण स्पर्धेत त्याला एकही षटक गोलंदाजी करता आली नाही.

वाचा- राहुल द्रविडकडे भारतीय संघाचे प्रशिक्षकपद; BCCIने दिला दुजोराSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: