WTC FINAL : फायनलच्या राखीव दिवसाचे हे आहेत तीन महत्वाचे नियम, जाणून घ्या


साऊदम्पटन : फायनलचा सामना आजच्या राखीव दिवसामध्ये निकाली निघू शकतो, असे चित्र निर्माण झाले आहेत. पण या फायनलच्या राखीव दिवसासाठी तीन महत्वाचे नियम बनवण्यात आले आहेत. या नियमांमध्ये नेमकं आहे तरी काय, याची उत्सुकता आता चाहत्यांना लागलेली आहे.

आयसीसीने या राखीव दिवसासाठी पहिला नियम असा बनवला आहे की, आजच्या दिवशी ३३० मिनिटांचा खेळ होऊ शकतो. यामध्ये निर्धारीत ८३ षटके टाकली जातील, त्याचबरोबर जर सामना निकाली लागत असल्याचे दिसत असेल तर अतिरीक्त १५ षटके खेळवली जाऊ शकतात.

आयसीसीचा दुसरा नियम असा आहे की, सामन्याचा जेव्हा अखेरच्या तासाचा खेळ सुरु होईल तेव्हा दोन्ही कर्णधारांना या लढतीबाबत निर्णय घेता येणार आहे. जर हा सामना निकाली निघणार नाही, असे दोन्ही कर्णधारांना वाटत असेल तर त्यावेळी ते दोघे एकत्र येऊ हा सामना अनिर्णीत झाल्याचे सांगू शकतात. त्यानंतर हा अजिंक्यपदाचा चषक दोन्ही संघांमध्ये विभागून दिला जाणार आहे. पण जर एकही कर्णधार सामना खेळवण्यासाठी इच्छूक असेल तर हा सामना अखेरपर्यंत खेळवला जाऊ शकतो. त्यानंतर हा सामना कधी थांबवायचा हा निर्णय पंचांच्या हातामध्ये असणार आहे.

आयसीसीचा तिसरा नियम असा आहे की, जेव्हा सामन्याचे अखेरचे षटक सुरु होईल, तेव्हा पंच या गोष्टीची कल्पना दोन्ही संघांना देतील. कसोटी क्रिकेटमध्ये नेमकी किती षटकांचा खेळ होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे दोन्ही संघांना अखेरचे षटक नेमके कोणते असेल, हे समजण्यासाठी पंच त्यांना ही माहिती देतील. त्यामुळे आज जर वातावरण चांगले असले तर नक्कीच ९८ षटकांचा खेळ होऊ शकतो. सामना जर रंगतदार अवस्थेत असेल तर हे सर्व षटके होऊ शकतात, अन्यथा अखेरच्या तासामध्ये जर हा सामना निकाली लागणार नाही, ्असे वाटत असेल तर दोन्ही कर्णधार एकत्रित येऊन हा सामना थांबवण्याचा निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे सामन्याचा अखेरचा तास महत्वाचा असेल.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: