Jitendra Awhad: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका; ‘या’ प्रकरणात कारवाई


हायलाइट्स:

  • गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका
  • अनंत करमुसे प्रकरणात ठाणे पोलिसांनी केली कारवाई.
  • ठाणे पोलीस आयुक्तांकडून माहितीस दुजोरा.

ठाणे : राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणात ठाणे पोलिसांनी अटक केली असून नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी या माहितीस दुजोरा देण्यात आला आहे. दरम्यान, ठाकरे सरकारमधील मंत्र्यावर झालेल्या या कारवाईन मोठी खळबळ उडाली आहे. ( Jitendra Awhad Arrest Update )

वाचा:‘कुणी तुमच्या खिशात पुडी टाकून तुम्हाला अटक करेल’; पवारांचा एनसीबीवर हल्लाबोल

अनंत करमुसे यांना जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३६५, ३२४, १४३, १४८, ५०६ अन्वये गुन्हा दाखल होता. याच गुन्ह्यात आव्हाड यांच्यावर आज अटकेची कारवाई करण्यात आली. त्यांना पोलिसांनी कोर्टात हजर केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर व हमीपत्रावर त्यांची सुटका करण्यात आली आहे.

कारवाईमागे ही शक्यता

अनंत करमुसे यांची याचिका मुंबई हायकोर्टात प्रलंबित आहे. एफआयआर नोंद होऊन दीड वर्ष उलटल्यानंतरही आव्हाड यांच्यावर कारवाई होत नसल्याचे करमुसे यांच्याकडून हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी कारवाई केली असण्याची शक्यता आहे. करमुसे यांची याचिका कदाचित पुढील आठवड्यात सुनावणीला येणार आहे. त्यांच्या वकिलांनी सुनावणीच्या लवकरच्या तारखेसाठी या आठवड्यात अर्ज दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आव्हाड यांच्यावर आज अटकेची कारवाई झाली असल्याचे दिसत आहे.

वाचा: आर्यनचा कोठडीतील मुक्काम वाढला; जामीन अर्जावर २० ऑक्टोबरला फैसला

नेमकं काय घडलं होतं?

घोडबंदर भागात राहणारे सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे यांनी आव्हाड यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. या पोस्टनंतर घरी आलेल्या पोलिसांनी करमुसे यांना आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यावर नेले आले आणि तिथे त्यांना १५ ते २० जणांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीच्या वेळी आव्हाड देखील बंगल्यात उपस्थित होते असे करमुसे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते. गेल्यावर्षी ५ एप्रिल रोजी हा प्रकार घडला होता. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी एप्रिल महिन्यात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. या प्रकरणात तीन पोलिसांनाही अटक झाली होती. दीड वर्षानंतर या प्रकरणात आता जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली. आव्हाड स्वत: वर्तकनगर पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्यांचा जबाबही नोंदवला. त्यानंतर त्यांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना जामीनही मंजूर केला.

वाचा: ‘पवारांचा तो आरोप हास्यास्पद; ५० वर्षे राजकारणात असूनही…’; पाटलांची टीकाSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: