धक्कादायक… वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये २ पदके जिंकणाऱ्या स्टार खेळाडूची हत्या; नवरा झाला फरार


नैरोबी : लांब पल्ल्याची धावपटू अॅग्नेस तिरोप बुधवारी (१३ ऑक्टोबर) तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली. अॅग्रेस केनियाची स्टार खेळाडू होती, तिने दोन वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदके जिंकली आहेत. तिच्या शरीरावर चाकूचे वार करण्यात आले होते. पोलिसांना याबद्दल अॅग्नेसच्या पतीची चौकशी करायची होती, पण तिच्या मृत्यूपासून तो फरार आहे. अॅग्नेसच्या हत्येमागे तिचा नवरा असल्याचा पोलिसांना संशय आहे.
२५ वर्षीय तिरोप आपल्या पतीसह पश्चिम केनियाच्या एटन शहरात राहत होती. पोलिसांना तिच्या घरीच तिचा मृतदेह सापडला. अॅग्नेसच्या गळ्यावर आणि पोटावर चाकूने वार करण्यात आले होते. त्यांची कार घराच्या बाहेर उभी होती. या कारच्या खिडकीच्या काचाही फुटल्या होत्या. पोलिसांनी यावरून अंदाज लावला की, अपघाताच्या वेळी अॅग्नेसचे तिच्या पतीशी भांडण झाले होते. याशिवाय, पोलिसांनी असेही सांगितले की, ‘अॅग्नेसच्या पतीने त्याच्या कुटुंबीयांना फोन केला आणि त्यांना रडत सांगितले की, ‘मी मोठी चूक केली आहे. मला माफ कर, अशी देवाकडे प्रार्थना करा.’

जागतिक स्पर्धेत देशासाठी जिंकले होते पदक
केनियाच्या अॅथलेटिक फेडरेशननेही अॅग्नेसच्या हत्येबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. फेडरेशनने याबाबतचं एक ट्विट केलं असून कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, ‘केनियाने एक हिरा गमावला.’ २०१७ आणि २०१९ मध्ये दहा हजार मीटर शर्यतीत तिरोपने कांस्यपदक जिंकले. त्याचबरोबर या वर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ती ५००० मीटर स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिली. गेल्या महिन्यात तिने १० किमी रोड रेसमध्ये विश्वविक्रम केला होता. तिची कारकीर्द २०१५ मध्ये सुरू झाली, तेव्हा ती १९ व्या वर्षी या स्पर्धेची दुसरी सर्वात तरुण चॅम्पियन बनली होती.

केनियाच्या राष्ट्रपतींनी व्यक्त केले दुःख
केनियाचे अध्यक्ष उथ्रू केन्याट्टा यांनी पोलिसांना या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्याचे आवाहन केले. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद बातमी आहे. आम्ही एक उदयोन्मुख स्टार खेळाडू गमावला आहे. त्याहून दु:खाची गोष्ट अशी आहे की, तिला काही दुराचारी आणि भ्याड लोकांमुळे आपला जीव गमवावा लागला.’Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: