सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; कधी होणार मतदान?


हायलाइट्स:

  • जिल्हा मध्यवर्ती बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर
  • अर्ज भरण्यास गुरुवारपासून प्रारंभ होणार
  • ऐन दिवाळीत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचणार

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच जाहीर झाली. बँकेच्या निवडणुकीची आचारसंहिता व अर्ज भरण्यास गुरुवारपासून प्रारंभ होणार आहे. या निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे.

जिल्हा बँकेसाठी मतदान दिवाळीनंतर २१ नोव्हेंबरला होणार आहे, तर मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे ऐन दिवाळीत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री जयंत पाटील आणि काँग्रेसचे सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्यासाठी जिल्हा बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.

udayanraje vs shivsendra singh raje:’मी लोटांगण घालीन, गडगडत जाईन वा लोळत जाईन’; उदयनराजेंचे शिवेद्रसिंहराजेंना प्रत्युत्तर

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम केव्हा जाहीर होणार? याकडे सर्वच राजकीय पक्षांचं आणि नेतेमंडळींचं लक्ष लागलं होते. अशातच मतदार यादीबाबत अन्य जिल्हा बँकांच्या कार्यक्षेत्रातील संस्थांनी याचिका दाखल केल्यामुळे त्याचा परिणाम होणार काय? याबाबतही तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु जिल्ह्यातील कोणत्याही संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली नसल्यामुळे निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला.

दरम्यान, बँकेच्या २१ जणांच्या संचालकांसाठी ही पंचवार्षिक निवडणूक होत आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा बँकेत निवडणूक कार्यालय सुरू करण्यात आलं आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: