rajnath hails indira gandhi : ‘इंदिरा गांधींनी युद्धावेळी देशाचे नेतृत्व केले’, राजनाथ सिंहांनी केले कौतुक


नवी दिल्लीः पाकिस्तानशी १९७१ ला झालेल्या युद्धावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ( rajnath hails indira gandhi ) घेतलेल्या ठोस भूमिकेबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांचे कौतुक केले आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी अनेक वर्षे फक्त देशाची सूत्रे सांभाळली नाही, तर युद्धकाळात त्याचे नेतृत्वही केले, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. सशस्त्र दलांमध्ये महिलांच्या भूमिकेबाबत शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) चर्चासत्राला संबोधित केलं. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी राणी लक्ष्मीबाई आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचाही उल्लेख केला. राष्ट्रीय विकासात महिला शक्तीच्या भूमिकेबद्दल भारताचा अनुभव सकारात्मक आहे, असं त्यांनी सांगितलं.

सशस्त्र दलांमध्ये महिलांच्या भूमिकेबद्दल बोलणं ठीक आहे. पण सुरक्षा आणि देशाच्या उभारणीत सर्व क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान मान्य केलं पाहिजे.
महिलांनी देशाच्या संरक्षणासाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी शस्त्र उचलल्याची अनेक उदाहरणे आहेत. राणी लक्ष्मीबाई त्यापैकी सर्वात प्रमुख आहेत. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वर्षानुवर्षे केवळ देशाची सूत्रेच सांभाळली नाही, तर युद्धाच्या काळातही नेतृत्व केलं. काही वर्षांपूर्वी प्रतिभाताई पाटील भारताच्या राष्ट्रपती आणि भारतीय सशस्त्र दलाच्या सर्वोच्च कमांडर होत्या, असं राजनाथ सिंहांनी सांगितलं.

‘पाकने सुधरावं अन्यथा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक होईल’ अमित शहांचा इशारा

इंदिरा गांधींच्या पंतप्रधानपदाच्या काळात भारताने पाकिस्तानविरुद्ध १९७१ चं युद्ध जिंकलं आणि नवीन देश बांगलादेशची निर्मिती झाली.
महिला शतकानुशतके पालक आणि संरक्षक म्हणून भूमिका बजावत आहेत. सरस्वती ज्ञान, बुद्धी आणि शिक्षणाची देवी आहे, तर माता दुर्गा सुरक्षा आणि शक्तीची देवी आहे. सशस्त्र दलांमध्ये महिलांच्या सहभागासाठी पुढाकार घेणाऱ्या काही देशांपैकी भारत एक आहे. महिलांना कायमस्वरूपी कमिशन म्हणून सैन्यात भरती केले जात असल्याचं ते म्हणाले.

rahul gandhi : पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून राहुल गांधींचा भाजपवर निशाणा; म्हणाले….

भारतीय सैन्य नर्सिंग सेवेत १०० वर्षांहून अधिक महिला अभिमानाने सेवा देत आहेत. भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांची भरती १९९२ मध्ये सुरू झाली. आता लष्कराच्या बहुतेक शाखांमध्ये महिला अधिकाऱ्यांची भरती केली जात आहे. पुढील वर्षापासून महिलांना राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये (एनडीए) प्रशिक्षण घेता येईल, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी दिली.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: