गोल्ड लोन झालं स्वस्त ; सार्वजनिक क्षेत्रातील या बँंकेने सणासुदीला कमी केला व्याजदर


हायलाइट्स:

  • सणासुदीच्या काळात खरेदीला प्रोत्साहन देणाऱ्या वेगवेगळ्या ऑफर पीएनबीने सादर केल्या आहेत.
  • गोल्ड लोनवरील व्याजदर आणि सोन्याच्या सार्वभौम बाँडमध्ये १.४५ टक्क्यांची कपात केली आहे.
  • पीएनबीने गृह कर्जाचे व्याजदर ६.६० टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत.

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) ग्राहकांसाठी सणासुदीच्या काळात खरेदीला प्रोत्साहन देणाऱ्या वेगवेगळ्या ऑफर सादर केल्या आहेत. ज्यामुळे बँकिंग सेवा आणि व्यवहार नेहमीपेक्षा अधिक सोप्या आणि आकर्षक बनल्या आहेत . बँकेने आपल्या नवीन योजनेचा भाग म्हणून, सोन्याच्या दागिन्यांवर घेतलेल्या कर्जावरील व्याजदर आणि सोन्याच्या सार्वभौम बाँडमध्ये १.४५ टक्क्यांची कपात केली आहे.

एसबीआय करणार मेगा ई-लिलाव; महागडी घरे आणि जमीन स्वस्तात खरेदी करण्याची संधी
पीएनबीने आता सार्वभौम सुवर्ण रोख्यांवरील कर्जासाठी ७.२० टक्के आणि सोन्याच्या दागिन्यांवर घेतलेल्या कर्जासाठी ७.३० टक्के व्याज दर देऊ केला आहे. याशिवाय, पीएनबीने गृह कर्जाचे व्याजदर ६.६० टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत.

शेअर बाजारात दिवाळी; सेन्सेक्स पहिल्यांदाच ६१००० अंकावर, गुंतवणूकदारांची कमाई
वाहन कर्जाचा दर ७.१५ टक्के आणि वैयक्तिक कर्ज ८.९५ टक्क्यांपासून उपलब्ध केले आहे. बँकिंग उद्योगात आकारल्या जाणाऱ्या सर्वात कमी व्याजदरांपैकी हा एक आहे, असा दावा पीएनबी बँकेने केला आहे.

मुकेश अंबानींची टॉप-१० मध्ये झेप ; वॉरेन बफे यांना टाकलं मागे, केला नवा विक्रम
बँकेने गृहकर्जावर आकारल्या जाणाऱ्या मार्जिन मनीमध्येही कपात केली आहे. अशा प्रकारे, गृहकर्ज घेणारे आता कोणत्याही उच्च मर्यादेशिवाय मालमत्तेच्या एकूण मूल्याच्या ८० टक्के पर्यंत कर्ज घेऊ शकतात. व्याजदर कपात आणि शून्य प्रोसेसिंग फी सह या सणासुदीच्या हंगामात, पीएनबी आपल्या ग्राहकांना अनेक रिटेल लोन उत्पादनांखाली अत्यंत स्पर्धात्मक दराने निधी प्रदान करत आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: