‘बॅलन्स शीट जुळल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ नगरला येतील’


हायलाइट्स:

  • शेतकऱ्यांच्या मदतीच्या मागणीसाठी भाजपचं नगरमध्ये उपोषण
  • नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सुजय विखेंची टीका
  • हिशेब सापडल्यानंतर मुश्रीफ नगरला येतील – सुजय विखे

अहमदनगर: ‘पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे त्यांचे बॅलन्सशीट चेक करत आहेत, ते त्यांचे अकाउंट बुक पाहत आहेत. नेमके किती पैसे आले आणि किती पैसे गेले याचा ते शोध घेत आहेत. ते एकदा सापडल्यानंतर नगर जिल्ह्यात येतील,’ अशी खोचक टीका खासदार सुजय विखे (Saujay Vikhe) यांनी केली आहे.

भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप केला आहे. त्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ हे नगर जिल्ह्यामध्ये एका शासकीय कार्यक्रमासाठी आले होते. तसेच त्यांनी नगर जिल्ह्यातील आपला दौरा रद्द केला होता. नगर जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. तिथेही हसन मुश्रीफ यांनी अद्याप भेट दिली नाही. या पार्श्वभूमीवर बोलताना आज सुजय विखे यांनी मुश्रीफ यांच्यावर तोफ डागली. ‘मुश्रीफ यांना त्यांचे बॅलन्स शीट पाहू द्या. अकाउंट चेक करू द्या. नेमके किती पैसे आले किती गेले हे एकदा कळू द्या, त्यानंतरच ते नगर जिल्ह्यात येतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

वाचा: ‘महात्मा गांधी राष्ट्रपिता आहेत असं मला वाटत नाही’

नगर जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून तातडीची आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणामध्ये सुजय विखे यांच्यासह भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा. राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्राध्यापक भानुदास बेरड आदी सहभागी झाले होते. या वेळी भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघडीवर जोरदार टीका केली.

वाचा: नवाब मलिक यांनी जाहीर केलेला ‘तो’ मोबाइल नंबर कोणाचा? चर्चेला उधाणSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: