तेजपूर ते तवांग : ‘सेला बोगद्या’च्या अखेरच्या टप्प्यातील कामाला सुरुवात, चीन सीमेवर मजबूत पकड


हायलाइट्स:

  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बटन दाबून केलं उद्घाटन
  • आसामच्या तेजपूरपासून – अरुणाचल प्रदेशातील तवांगला जोडणारा ‘सेला बोगदा’
  • तवांगद्वारे चीन सीमेपर्यंतचं अंतर १० किलोमीटरनं कमी होणार
  • नदीखाली तयार करण्यात आलेला बोगद्याच्या स्वरुपातील देशातला पहिला रस्ते मार्ग

नवी दिल्ली :संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीतूनच आज (गुरुवारी) अरुणाचल प्रदेशात तयार करण्यात आलेल्या सेला बोगद्याच्या अखेरच्या टप्प्याच्या कामाचं उद्घाटन केलं. यामुळे तवांगद्वारे चीन सीमेपर्यंतचं अंतर १० किलोमीटरनं कमी होणार आहे.

यावेळी, ‘जगातील सर्वात उंचीवर तयार करण्यात आलेला अटल बोगदा असो किंवा जगातील सर्वात उंच मोटरेबल पास (लेह – पँगाँग लेकला जोडणारा केला पास – १८,६०० फूट) असो किंवा अंतिम टप्प्यापर्यंत पोहचणारा सेला बोगदा असो… बीआरओची कामगिरी ही जगात अध्ययनाचा विषय ठरू शकते’, असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं.

दिल्लीतूनच बटन दाबून उद्घाटन

संरक्षण मंत्र्यांनी आज राजधानी दिल्लीतील ‘राष्ट्रीय युद्ध स्मारका’हून ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ (BRO) द्वारे आयोजित करण्यात आलेल्या मोटारसायकल रॅली मोहिमेला झेंडा दाखवत रवाना केलं. सोबतच, संरक्षण मंत्र्यांनी इथूनच एक बटन दाबून सेला बोगद्यातील स्फोटासह या योजनेच्या अखेरच्या टप्प्यातील कामाला सुरुवात केली.

‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ (BRO) द्वारे मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आली

BSF Power Jurisdiction: BSF अधिकार बदलांवरून आपांपसात भिडले पंजाबचे आजी-माजी मुख्यमंत्री
Poonch Terror Attack: पूँछ हल्ल्यातील शहीद जवानाच्या पार्थिवाला मुख्यमंत्र्यांनी दिला खांदा

तेजपूर ते तवांग जोडणारा भूमिगत रस्ता

सेला बोगद्याचं निर्माण कार्य जून २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सेला पासपासून जाणाऱ्या या बोगद्यामुळे तवांगद्वारे चीन सीमेपर्यंतच अंतर तब्बल १० किलोमीटरपर्यंत कमी होणार आहे. तसंच या बोगद्यामुळे आसामच्या तेजपूरपासून – अरुणाचल प्रदेशातील तवांग स्थित सेनेच्या ४ कोअर मुख्यालयापर्यंतच्या प्रवासाचा वेळ एक तासांनी कमी होणार आहे.

अरुणाचल प्रदेशावर नियंत्रण ठेवणारं सेनेचं ४ कॉर्प्स मुख्यालय आसामच्या तेजपूरमध्ये स्थित आहे. भारत चीन सीमेवर स्थित तवांग द्वारही तेजपूर आहे. आपात्कालीन परिस्थितीत तेजपूरपासून पश्चिम अरुणाचल प्रदेश पर्यंत पोहचणं सोपं व्हावं, यासाठी भूमिगत बोगदा तयार करण्यात आला आहे.

jem commander terrorist sham sofi killed : जैश ए मोहम्मदचा टॉप कमांडर सोफी याचा खात्मा, काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश
india china news : उपराष्ट्रपतींच्या अरुणाचल दौऱ्यावर चीनचा आक्षेप, भारताचे खणखणीत प्रत्युत्तर

नदीखाली तयार करण्यात आलेला पहिला भूमिगत मार्ग

सेला बोगद्याची लांबी १२ – १५ किलोमीटर आहे. यासाठी तब्बल ५००० कोटी रुपयांची खर्च अपेक्षित आहे. सेला बोगदा हा एखाद्या नदीखाली तयार करण्यात आलेला बोगद्याच्या स्वरुपातील देशातला पहिला रस्ते मार्ग ठरतोय.

१९६२ च्या युद्धात चीनी सेनेनं अरुणाचल प्रदेशातील तवांग ओलांडत तेजपूरपासून २० किलोमीटर दूर अंतरापर्यंत पोहचण्याचं दु:स्साहस केलं होतं. मात्र, युद्ध समाप्तीच्या घोषणनेनंतर चीनी सेना माघारी फिरली होती.

channi – amit shah : नवा मुद्दा पेटला! केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्णयाने पंजाब, पश्चिम बंगालला झटका
manmohan singh admitted : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, एम्समध्ये दाखलSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: