IPL फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा पराभव निश्चित; या एका गोष्टीचे धोनीकडे उत्तर नाही


दुबई: आयपीएलच्या १४व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा क्वालिफायर २ च्या लढतीत पराभव करून कोलकाता नाईट रायडर्सने अंतिम फेरीत प्रवेश केला. आता अंतिम सामन्यात त्यांची लढत महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणार आहे. ही लढत उद्या १५ ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.

वाचा- अचानक शार्दुलची भारतीय संघात निवड का करण्यात आली? जाणून घ्या खर कारण

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात कोलकाताने दिल्लीचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. कोलकाता संघाने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर चेन्नई सुपर किंग्जने क्वालिफायर १च्या लढतीत दिल्लीचा पराभव करुन आधीच अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. चेन्नई संघाची ही अंतिम फेरीत पोहोचण्याची ९वी वेळ आहे. आयपीएलच्या १४व्या हंगामात केकेआर संघाने सुरुवातीच्या सात लढतीत फक्त २ मध्ये विजय मिळवला होता. पण दुसऱ्या सत्रात त्यांनी शानदार कामगिरी केली आणि सात पैकी पाच सामन्यात विजय मिळवत गुणतक्त्यात ४ स्थान मिळवले. त्यानंतर आरसीबी आणि दिल्लीचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. या उटल चेन्नई सुपर किंग्ज संघाची कामगिरी सातत्यपूर्ण झाली आहे. प्ले ऑफ आणि अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला संघ ठरला होता. पण एक गोष्ट अशी आहे ज्याचे उत्तर चेन्नई संघाकडे नाही आणि त्यामुळेच उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांचा पराभव होऊ शकतो.

वाचा- टी-२० वर्ल्डकपमधील भारताची मॅच रद्द; जाणून घ्या वेळापत्रकातील नवे बदल

चेन्नई सुपर किंग्जने १३ पैकी ११ हंगामात भाग घेतला आहे. त्यापैकी ८ हंगामात त्यांनी अंतिम फेरीतीत प्रवेश केला आहे. या ८ अंतिम सामन्यात त्यांना फक्त ३ वेळा विजय मिळवता आलाय. तर पाच वेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आयपीएलच्या अंतिम फेरीत सर्वात अपयशी संघ अशी देखील चेन्नई ओळख आहे. या उलट कोलकाता नाईट रायडर्स संघाने आतापर्यंत दोन वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे आणि दोन्ही वेळा त्यांनी विजेतेपद मिळवले आहे. २०१२ साली कोलकाताने चेन्नईचा पराभव केला होता. तेव्हा चेन्नईला विजेतेपदाची हॅटट्रिक करण्याची संधी होती. पण चेन्नईने दिलेल्या १९१ धावांचे आव्हान कोलकाताने अखेरच्या षटकात पार केले आणि पहिले विजेतेपद मिळवले. त्यानंतर २०१४ साली पंजाब किंग्ज संघाने दिलेल्या १९९ धावांचे आव्हान कोलकाताने ३ चेंडू आणि ३ विकेट राखून पार केले होते. कोलकाता संघाची अंतिम फेरीतील कामगिरी पाहता उद्याच्या लढतीत त्यांचे पारडे जड वाटते.

वाचा- #Fixerkings चेन्नई सुपर किंग्जवर फिक्सिंगचा आरोप; सोशल मीडिायवर राडा सुरू

गेल्या काही सामन्यात कोलकाता संघाची कामगिरी शानदार झाली आहे. फिरकी आणि जलद गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना कमी धावसंख्येवर रोखण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या लढतीत चेन्नईचा संघ चौथे विजेतेपद मिळवतो की कोलकाता संघ तिसरे विजेतेपद मिळून चेन्नईशी बरोबरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: