Charanjit Singh Channi: मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या लग्नात ड्युटीवर तैनात पोलिसांचा नशेत धिंगाणा, चार जण निलंबित


हायलाइट्स:

  • मुख्यमंत्र्यांचा मुलगा नवजीत कौर आणि सिमरनधीर कौर यांचा विवाह
  • चार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
  • मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील त्रुटीसंबंधी पोलीस महासंचालकांना पत्र

चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यात पोलिसांनी दारुच्या नशेत धुमाकूळ घातल्याचं समोर येतंय. राज्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पत्र लिहून पोलीस महासंचालकांना यासंबंधी माहिती दिलीय. या पत्रात सुरक्षेसंबंधी इतर बेजबाबदारपणाचाही उल्लेख करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांचा मुलगा नवजीत सिंह याचा रविवारी, १० ऑक्टोबर रोजी मोहालीच्या एका गुरुद्वारामध्ये इंजिनिअरींग पदवीधर असलेल्या सिमरनधीर कौर हिच्याशी अगदी साध्या पद्धतीनं विवाह संपन्न झाला. यापूर्वी, ८ ऑक्टोबर रोजी महिला संगीत कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सुरक्षेत पोलिसांकडून बेजबाबदारपणाचं वर्तन समोर येतंय.

कार्यक्रमा दरम्यान सुरक्षेत तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दारुचे पेग रिचवत डान्स फ्लोअरवरही धुमाकूळ घातला.

मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या लग्नात ड्युटीवर असताना दारू पिऊन मौज-मस्ती करणाऱ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. सीआयए खरग इन्चार्ज सुखबीर सिंह, हवालदार जसकरण सिंह, हवालदार दर्शन सिंह आणि शिपाई सतबीर सिंह अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत. त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आलीय.

मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यातील एका कार्यक्रमात पोलीस कर्मचाऱ्यांनी दारु रिचवून पार्टीत गोंधळ घालणं, पाहुण्यांचा अपमान करणं आणि नशेच्या धुंदीत जमिनीवर लोळण्याचा आरोप करण्यात आलाय. या कार्यक्रमात पोलीस कर्मचारी आणि गेझेटेड अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या पाया पडतानाही आढळल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. साध्या वर्दीत तैनात महिला पोलीस कर्मचारीही ड्युटीऐवजी मौज-मस्ती करताना आढळल्या.

Poonch Terror Attack: पूँछ हल्ल्यातील शहीद जवानाच्या पार्थिवाला मुख्यमंत्र्यांनी दिला खांदाchanni – amit shah : नवा मुद्दा पेटला! केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्णयाने पंजाब, पश्चिम बंगालला झटका

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत त्रुटी

– या कार्यक्रमा दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत अनेक त्रुटी आढळल्याचं पत्रात म्हटलं गेलंय.

– मुख्य प्रवेशद्वारावर पुरेशी तपास यंत्रणा नसल्यानं अनेक कर्मचाऱ्यांनी हत्यारासंहीत कार्यक्रम स्थळावर प्रवेश केला.

– व्हीआयपी आणि विशेष व्यक्ती आपल्या वाहनांतून इथे उपस्थित होत असताना या ठिकाणी कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला नव्हता. त्यामुळे कुणीही व्यक्ती व्हीआयपी म्हणून सहज कार्यक्रम स्थळी प्रवेश करू शकत होता.

– मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेले अनेक कमांडो आपापल्या मोबाईलवर व्हिडिओ पाहण्यात व्यग्र होते.
– सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी दारूच्या नशेत होते.

– मुख्य प्रवेशद्वारावर तैनात कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम संपण्यापूर्वीच आपल्या ड्युटीच्या जागा सोडल्या होत्या

karnataka congress controversy : आता कर्नाटक काँग्रेस वादात, नेत्यांच्या कुजबुजीच्या व्हायरल व्हिडिओने खळबळ
manmohan singh admitted : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, एम्समध्ये दाखलSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: