इंधन महागाईचा आगडोंब; जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचा भाव


हायलाइट्स:

  • पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवले आहेत.
  • आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११०.३८ रुपयांवर स्थिर आहे.
  • ऑक्टोबरमध्ये पेट्रोल २.८० रुपयांनी महागले

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवले आहेत. या आधी सोमवारी कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल दरात वाढ केली होती तर मंगळवारी इंधन दर स्थिर ठेवले होते.

सण-उत्सवांमध्ये वैयक्तिक कर्ज घेताय? मग या गोष्टी ठेवा लक्षात
आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११०.३८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल १०४.४४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.७६ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०५.०५ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११२.९६ रुपये असून बंगळुरात पेट्रोल १०८.०४ रुपये आहे.

महिलांची कमाई त्यांच्या पतीपेक्षा कमी का? अभ्यासातून समोर आली नवी माहिती
आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव १०१.०० रुपये आहे. दिल्लीत डिझेल ९३.१८ रुपये आहे. चेन्नईत ९७.५६ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९६.२४ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव १०२.२५ रुपये असून बंगळुरात डिझेल ९८.२५ रुपये आहे.

झाले मोकळे आकाश! देशांतर्गत विमान सेवेबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावल्याने ऑक्टोबरमध्ये पेट्रोल २.८० रुपयांनी महागले आहे तर डिझेल ३.३० रुपयांनी महागले आहे.
अमेरिकन बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ०.२३ डॉलरने घसरला आणि ८३.४२ डॉलर प्रती बॅरल झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.१० डॉलरने घसरून ८०.५२ डॉलर झाला. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या रिपोर्ट अनुसार, १ ऑक्टोबर २०२१ रोजी समाप्त होणार्‍या आठवड्यात यूएस क्रूड इन्व्हेंटरीमध्ये सुमारे २.३ मिलियन बॅरलची वृद्धी झाली. तेलाचा कमी पुरवठा आणि नैसर्गिक गॅसच्या वाढत्या किंमती या ओढाताणीत आर्थिक क्रियाकलापातील सुधार पाहता इंधनाच्या वाढत्या मागणीमुळे आगामी आठवड्यात किंमती वाढू शकतात.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: