manmohan singh admitted : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, एम्समध्ये दाखल


नवी दिल्लीःमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना ताप आल्यानंतर दिल्लीतील एम्समध्ये दाखल ( manmohan singh admitted ) करण्यात आलं आहे. त्यांना दोन दिवसांपूर्वी ताप आला आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आज त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे आणि काळजी करण्यासारखं काहीच नाही, असं सूत्रांनी सांगितलं.

मनमोहन सिंग यांना या वर्षी करोनाचा संसर्ग झाला होता. १९ एप्रिलला करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यानंतर २९ एप्रिलला त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला. माजी पंतप्रधानांनी ४ मार्च आणि ३ एप्रिलला करोना लसीचे दोन डोस घेतले होते.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे ८८ वर्षांचे आहेत आणि त्यांना मधुमेह आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर दोन बायपास शस्त्रक्रिया देखील झाल्या आहेत. त्याची पहिली शस्त्रक्रिया ब्रिटनमध्ये १९९० मध्ये करण्यात आली. तर २००९ मध्ये त्यांची दुसरी बायपास शस्त्रक्रिया एम्समध्ये करण्यात आली. गेल्या वर्षी एका नवीन औषधाची रिअॅक्शन आणि तापामुळे मनमोहन सिंग यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. बऱ्याच दिवसांनी त्यांना हस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता.

india china news : उपराष्ट्रपतींच्या अरुणाचल दौऱ्यावर चीनचा आक्षेप, भारताचे खणखणीत प्रत्युत्तर

माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग हे सध्या राजस्थानमधून राज्यसभेचे खासदार आहेत. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ पर्यंत पंतप्रधान होते.

लखीमपूर हिंसा : राहुल-प्रियांका गांधी राष्ट्रपतींच्या भेटीला, दोन मागण्या मांडल्याSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: