T 20 WORLD CUP : भारताच्या विश्वचषकाच्या संघात कोण करतंय मोठे बदल, पाहा सूत्रधार आहे तरी कोण…


नवी दिल्ली : भारताच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघात एकामागून एक बदल आता होत आहेत. शार्दुल ठाकूर आणि अवेश खान यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. पण हे बदल आता नेमके का होत आहेत आणि या बदलांच्या मागे नेमका सूत्रधार आहे तरी कोण, याची उत्सुकता आता चाहत्यांना लागलेली आहे.

बीसीसीआयने यापूर्वीच भारताचा संघ जाहीर केला होता. या संघामध्ये राखीव खेळाडू आणि नेट बॉलर यांचाही समावेश करण्यात आला होता. पण त्यानंतरही भारतीय संघात आला मोठे बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज भारताच्या संघात शार्दुल ठाकूरची एंट्री झाली. शार्दुलला अक्षर पटेलच्याजागी भारतीय संघात स्थान देण्यात आले. मंगळवारीही भारतीय संघात अवेश खानला नेट बॉलर म्हणून संघात स्थान देण्यात आले, त्याचबरोबर वेंकटेश अय्यर आणि संजू सॅमसन यांनाही आयपीएलनंतर युएईमध्ये थांबण्यासाठी बीसीसीआयने सांगितले आहे. त्यामुळे आता अजून काही बदल भारतीय संघात अपेक्षित आहेत, असे म्हटले जात आहे. पण जेव्हा संघ निवडला होता तेव्हा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या संमतीनेच निवडला होता. पण आता यामध्ये होणारे बदल हे महेंद्रसिंग धोनीमुळे होत असल्याचे म्हटले जात आहे. कारण धोनीची भारतीय संघाच्या मार्गदर्शकपदी निवड करण्यात आली होती, त्यापूर्वी संघ निवडण्यात आला होता. त्यामुळे या संघ निवडीमध्ये धोनीला कोणतेही स्थान नव्हते. पण धोनी बऱ्याच कालावधीपासून युएईमध्ये आहे आणि भारताच्या प्रत्येक खेळाडूला तो चांगले ओळखतो. त्याचबरोबर धोनीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. त्याचबरोबर धोनीच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघाने पहिला ट्वेन्टी-२० विश्वचषकही जिंकला होता. त्यामुळे धोनीला भारतीय संघात चांगलेच वजन आहे. त्यामुळे विश्वचषकात कोणते संघ चांगली कामगिरी करू शकतात, यासाठी धोनी संघात एकामागून एक बदल करत आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळे धोनीचा भारताच्या संघनिवडीत आता मोठा वाटा असेल, असेही दिसत आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: