lakhimpur case : लखीमपूर हिंसाचाराचा मुद्दा अमेरिकेतही गाजतोय! सीतारामन यांना विचारला प्रश्न, काय दिले उत्तर?


नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( nirmala sitharaman ) या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेतील हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये एका चर्चेदरम्यान निर्मला सीतारामन यांना लखीमपूर हिंसाचारावर ( lakhimpur kheri violence ) प्रश्न विचारला गेला. यावर निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिलं. लखीमपूर खिरी हिंसाचाराची घटना ही ‘पूर्णपणे निषेधार्ह’ आहे. भारताच्या इतर भागातही अशा घटना घडतात. पण त्या जेव्हा घडल्या तेव्हाच उठवल्या पाहिजेत. त्या नंतर त्या उठवल्या जाऊ नयेत. त्या राज्यात भाजपचे सरकार असल्याने काहींनी हा मुद्दा उचलून धरला आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.

पंतप्रधान मोदी आणि इतर वरिष्ठ मंत्र्यांकडून लखीमपूर हिंसाचारावर कुठलीही प्रतिक्रिया दिली गेली नाही. कोणी विचारल्या बचाव करणारी प्रतिक्रिया का दिली जाते? असा प्रश्न त्यांना विचारला गेला. ‘असं अजिबात नाही. तुम्ही या घटनेबद्दल प्रश्न उपस्थित केला हे, बरं झालं. ही घटना पूर्णपणे निषेधार्ह आहे आणि सरकारमधील प्रत्येकजण हेच म्हणतोय. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या इतर ठिकाणी घडणाऱ्या घटना या माझ्यासाठी चिंतेचे कारण आहेत’, असं उत्तर निर्मला सीतारामन यांनी दिलं.

भारतात अशी प्रकरणं देशाच्या विविध भागांमध्येही घडत आहेत. भारत जाणून असलेल्यांनी डॉ.अमर्त्य सेन यांच्यासह इतर अनेकांनी प्रत्येक वेळी अशी घटना घडली की ती मांडली पाहिजे. या प्रकारची घटना फक्त तेव्हाच उभी करू नये जेव्हा ती आपल्यासाठी अनुकूल असेल. कारण ही घटना अशा राज्यात घडली जिथे भाजप सत्तेत आहे. ज्यामध्ये मंत्रिमंडळातील एका सहकाऱ्याचा मुलगा कदाचित अडचणीत आहे, असं सीतारामन यांनी सांगितलं.

‘लखीमपूर हिंसाचाराच्या घटनेमागे कोण आहे? याचा शोध घेण्यासाठी सखोल तपास केला जाईल. आणि हे आपल्या पक्षाचा किंवा पंतप्रधानांचा बचाव करण्यासाठी नाही. हा भारताचा मुद्दा आहे. भारतासाठी बोलेन. गरिबांना न्याय देण्याविषयी बोलेल. यावर कुणी खिल्ली उडवली तर त्याला मी उत्तर देईन. तथ्यांवर बोला, असं त्यांना मी सांगेल’, असं उत्तर सीतारामन यांनी दिली.

लखीमपूर हिंसा : राहुल-प्रियांका गांधी राष्ट्रपतींच्या भेटीला, दोन मागण्या मांडल्या

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी जिल्ह्यात ३ ऑक्टोबरला हिंसाचार झाला. यात ४ शेतकऱ्यांसह एकूण ८ जणांची हत्या केली गेली. यावरून उत्तर प्रदेशातील भाजपचे योगी सरकार गोत्यात आले आहे. या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हा मुख्य आरोपी आहे. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

cabinet decision : खतांवर अनुदान देत शेतकऱ्यांना दिलासा, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

भारत सरकारने आणलेल्या तीन सुधारित कृषी कायद्यांवर विविध संसदीय समित्यांनी एक दशकांहून अधिक काळ चर्चा केली. भाजप २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर या तीन कायद्यांवर केंद्र सरकारने राज्य सरकारांशी स्वतंत्रपणे चर्चा केली आणि प्रत्येक भागधारकांशी सल्लामसलत केली, असं उत्तर शेतकऱ्यांच्या आंदोलनावरील एका प्रश्नाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: