Pune Murder case: कबड्डीपटू मुलीच्या हत्येआधी त्यांनी ‘लॉन’ची रेकी केली होती!


हायलाइट्स:

  • पुण्यातील बिबवेवाडीत कबड्डीपटू मुलीच्या खुनाने खळबळ
  • मुख्य आरोपी स्वत:हून पोलिसांसमोर हजर
  • अन्य तीन आरोपींना अटक, अधिक चौकशी सुरू

पुणे: पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या बिबवेवाडी (Bibvewadi) येथील कबड्डीपटू मुलीच्या खून (Kabaddi Player Murder in Pune) प्रकरणातील मुख्य आरोपी स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाला आहे. पोलिसांनी अन्य तीन जणांनाही अटक केली आहे. या प्रकरणी तातडीनं तपास करून, लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असं पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी आज स्पष्ट केलं.

बिबवेवाडीतील यश लॉन्स येथे सराव करत असलेल्या १४ वर्षीय कबड्डीपटू मुलीवर कोयत्याने वार करून तिचे शिर धडावेगळे करत खून करण्यात आला होता. मंगळवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली होती. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांना अटक केली. तर, मुख्य आरोपी ओंकार उर्फ शुभम बाजीराव भागवत (वय २१, सध्या-रा. चिंचवड) हा स्वत: पोलिसांसमोर हजर झाला आहे.

वाचा: पुण्यातील जनता वसाहतीमध्ये खळबळ; दगडाने ठेचून एकाचा खून

एकतर्फी प्रेमातून नात्यातील मुलानंच हे कृत्य केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचं अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं. आरोपी पाच वर्षांपासून मृत मुलीच्या शेजारी राहत होता. इतर आरोपी हे सोबत आले होते. आरोपींची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं निदर्शनास आलेलं नाही. दोन-तीन दिवस आधी ही आरोपी मुलं मैदानात रेकी करून गेली होती, असंही गुप्ता यांनी सांगितलं.

वाचा: LIVE आर्यन खानला जामीन मिळणार का? आज फैसलाSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: