टाटा मोटर्सचा शेअर सुस्साट! गाठला वर्षभराचा उच्चांक, हे आहे त्यामागचे खरे कारण


हायलाइट्स:

  • टाटा मोटर्सचा शेअर १८.५५ टक्क्यांनी वाढून ४९८.८५ रुपयांवर पोहोचला
  • आज शेअरसाठी ५२ आठवड्यांचा उच्चांक ठरला आहे.
  • टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनीमध्ये १ अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी ऑटोमोटिव्ह कंपनी टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये बुधवारी (१३ ऑक्टोबर) १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खाजगी इक्विटी फर्म टीपीजी ग्रुप टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनीमध्ये १ अब्ज डॉलर किंवा ७,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या बातमीमुळे, टाटा मोटर्सचा शेअर १८.५५ टक्क्यांनी वाढून ४९८.८५ रुपयांवर पोहोचला असून तो ५२ आठवड्यांचा उच्चांकही ठरला आहे.

झाले मोकळे आकाश! देशांतर्गत विमान सेवेबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, टीपीजी TML EVCo मध्ये हप्त्यांमध्ये गुंतवणूक करेल. त्याची पहिली फेरी मार्च २०२२मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि संपूर्ण गुंतवणूक २०२२ च्या अखेरीस पूर्णत्वास येईल. या करारासाठी TML EVCo चे मूल्य ९.१ अब्ज डॉलर आहे. त्यानुसार टीपीजी समूहाला कंपनीत ११ ते १५ टक्के हिस्सा मिळणार आहे. टाटा मोटर्स आपल्या पॅसेंजर व्हेईकल डिव्हिजनला उपकंपनीकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेत आहे. यात ईव्ही पोर्टफोलिओचाही (EV Portfolio) समावेश आहे. यासाठी कंपनीला मार्चमध्ये शेअरधारकांकडून मंजुरी मिळाली होती. प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा या कंपनीत १.१४ टक्के हिस्सा आहे.

सेन्सेक्स-निफ्टी तेजीत ; कोळसा टंचाईने ऊर्जा कंपन्यांचे शेअर वधारले
टाटा आणणार १० इलेक्ट्रिक बाईक
दरम्यान, टाटा ग्रुप अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी आणि सौदी अरेबियाच्या पीआयएफ सारख्या काही सार्वभौम संपत्ती फंडांशी (सॉवरेन वेल्थ फंड्स) देखील चर्चा करत आहे, पण त्यांची गुंतवणूक टीपीजीपेक्षा कमी असेल, असे मानले जाते. त्यामुळे टीपीजीला अँकर गुंतवणूकदार दर्जा मिळू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा समूह कॅलिफोर्निया पब्लिक रिटायरमेंट सिस्टीम (कॅलपर्स) शीही चर्चा करत आहे. यापैकी बरेच गुंतवणूकदार टीपीजी कॅपिटलचे मर्यादित भागीदार (एलपी) आहेत. टाटा मोटर्सने २०२५ पर्यंत देशात १० नवीन इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणण्याची घोषणा केली आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: