तालिबान राजवटीत भक्तीचा गजर; हिंदू समुदायाकडून नवरात्रौत्सवाचे आयोजन


काबूल: तालिबानने अफगाणिस्तानच्या सत्तेवर ताबा मिळवल्यानंतर दहशत आणि तणावाचे वातावरण तयार झाले होते. आता हे वातावरण निवळत असल्याचे चित्र आहे. काबूलमध्ये अल्पसंख्यक हिंदू समुदायाने नवरात्रौत्सवानिमित्ताने मंदिरात भजन आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले.

मंगळवारी हिंदू समुदायाने काबूलमधील असमाई मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्ताने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे काही व्हिडिओ समोर आले आहेत.

भारत आणि तालिबानमध्ये चर्चा होणार? ‘या’ देशात बैठकीची शक्यता

असमाई मंदिर व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष राम शरण सिंह यांनी सांगितले की, नवरात्रीनिमित्ताने भजनासह महाप्रसादाचे आयोजन केले होते. यामध्ये गरजूंना अन्न वाटपही करण्यात आले. या कार्यक्रमात जवळपास १५० जण सहभागी झाले होते. यामध्ये अफगाणिस्तानमधील हिंदूसह शीख समुदायातील व्यक्तीही सहभागी झाले होते.

‘या’ देशात महागाईचा आगडोंब; दूधाचा दर प्रतिलिटर ११०० रुपयांवर, गॅस सिलिंडर अडीच हजारांवर!
या नागरिकांनी भारत सरकारकडे मदतीचे आवाहन केले आहे. अफगाणिस्तानमधून पुन्हा भारतात नेण्याचे आवाहनही हिंदू-शीख नागरिकांनी केले. सध्या अफगाणिस्तानची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

हे मंदिर काबूलमधील ‘करते परवान’ गुरुद्वारापासून ४-५ किलोमीटर अंतरावर आहे. या गुरुद्वाराची मागील आठवड्यात काही संशयित तालिबानींनी तोडफोड केली होती.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: