बँंकांना दिलासा; मल्ल्या, नीरव मोदी, चोक्सीच्या जप्त मालमत्तेतून झाली बंपर वसुली


हायलाइट्स:

  • गेल्या काही वर्षात ‘ईडी’ने विजय मल्ल्या , मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी या तिघांची मालमत्ता जप्त केली होती.
  • विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी या तिघांनी बँकांचे जवळपास २२५८६ कोटीचे कर्ज बुडवले आहे.
  • त्यापैकी सक्तवसुली संचनालयाने ८०.४५ टक्के म्हणजेच १८१७० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

मुंबई : फरार उद्योजक विजय मल्ल्या आणि हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या तिघांकडून आतापर्यंत जप्त केलेल्या मालमत्तेपैकी ९३७१ कोटी बँकांना परत करण्यात आले आहे. सक्तवसुली संचनालयाने (ईडी) बँकांना ही रक्कम दिली आहे. यामुळे कर्ज वसुलीच्या चिंतेत असलेल्या बँकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.

कमॉडिटी तेजीत; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव
मनी लाॅंडरिंग कायद्यांअंतर्गत गेल्या काही वर्षात ईडीने विजय मल्ल्या , मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी या तिघांची मालमत्ता जप्त केली होती. विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी या तिघांनी बँकांचे जवळपास २२५८६ कोटीचे कर्ज बुडवले आहे. त्यापैकी सक्तवसुली संचनालयाने ८०.४५ टक्के म्हणजेच १८१७० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. यातील काही रक्कम आणि मालमत्ता कर्जदार बँका आणि केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आली.

तिघांकडून एकूण १८१७०.०२ कोटींची संपत्ती जप्त केल्याचे ईडीने म्हटलं आहे. बँकाच्या एकूण तोट्यामध्ये हे प्रमाण ८०.४५ टक्के आहे. ज्या बँकांनी या तिघांना आणि त्यांच्या कंपन्यांना कर्ज दिली होती त्या बँकांना जप्त मालमत्तेतील ९३७१ कोटी देण्यात आले असल्याची माहिती ईडीकडून आज यासंदर्भात ट्विट करण्यात आली आहे.

कृषी संशोधनात गुंतवणूक संधी;’इंडिया पेस्टिसाइड्स लिमिटेड’चा आयपीओ आजपासून
ईडीच्या या निर्णयानंतर मल्ल्या, चोक्सी आणि मोदीला दिलेल्या एकूण कर्जापैकी बँकांची जवळपास ४० टक्के रक्कम वसूल झाल्याचे बोलले जाते. दरम्यान, मल्ल्या, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाबाबत संबंधित देशांच्या सरकारशी चर्चा सुरु असल्याचे ईडीने म्हटलं आहे.

विजय मल्ल्याला दणका ; कर्ज वसुलीसाठी बँकांनी घेतला हा मोठा निर्णय
मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे पीएनबी बँकेची १४५०० कोटींची फसवणूक केली होती. यातील नीरव मोदी लंडनच्या तुरुंगात आहे. तर मेहुल चोक्सी याला गेल्या महिन्यात डॉमिनिकाच्या पोलीसांनी अटक केली होती. गुंतवणूक करून नागरिकत्व मिळवलेला मेहुल चोक्सी गेली तीन वर्षे अँटिग्वा अँड बार्बुडा या देशात आश्रयाला होता. आयडीबीआय आणि एसबीआयसह १० हुन अधिक बँकांची फसवणूक करणाऱ्या विजय मल्ल्या याला यापूर्वीच विशेष न्यायालयाने फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषीत केलं आहे. मल्ल्याची प्रत्यार्पण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: