पुण्यातील जनता वसाहतीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना


हायलाइट्स:

  • पुण्यातील जनता वसाहतीमध्ये खळबळजनक घटना
  • डोक्यात दगड घालून तरुणाचा खून
  • दत्तवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी । पुणे

जनता वसाहत येथील रामकृष्ण मठाच्या मागे कॅनॉल रोडजवळ एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Man found dead in Pune‘s janta colony)

योगेश अंकुश भोकरे (वय ३८, रा. गल्ली नं. २३, जनता वसाहत) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी आदिती योगेश भोकरे (वय. ३१, रा. जनता वसाहत ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा: मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर आयशर टेम्पोला आग; एकाचा होरपळून मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश भोकरे हे मंगळवारी सायंकाळी औषध घेऊन येण्याचा बाण्याने घराबाहेर पडले होते. त्यानंतर रात्री त्यांचा मृतदेह कॅनॉल रोडला पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता भोकरे यांच्या डोक्यात, चेहर्‍यावर दगड घालून त्यांचा खून केल्याचे आढळून आले. भोकरे यांची ओळख पटू नये म्हणून आरोपींनी त्यांच्या अंगावरील पॅन्ट देखील काढून फेकून दिले आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस तपास करत आहेत.

मुंबईत जळीतकांड; पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या २० दुचाकी जळून खाकSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: