भारत आणि तालिबानमध्ये चर्चा होणार? ‘या’ देशात बैठकीची शक्यता


मॉस्को: अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतल्यानंतर तालिबान आणि भारतादरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानच्या मुद्यावर २० ऑक्टोबर रोजी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत भारतही सहभागी होण्याची शक्यता आहे. भारत आणि तालिबानचे अधिकारी पहिल्यांदाच बैठकीत सहभागी होतील.

रशियाकडून तालिबानला मॉस्कोमध्ये बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे. या बैठकीत तालिबानचे कोणते अधिकारी सहभागी होतील, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. तालिबान सत्तेवर आल्यानंतर मॉस्कोमध्ये ही पहिलीच चर्चा असणार आहे. अफगाणिस्तानमध्ये एक सर्वसमावेशक सरकार असावे असे आवाहन रशियाने केले होते. त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होणार असून इतरही काही मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी असणार आहेत.

चीनची भारताला धमकी; युद्ध झाल्यास पराभवाचे तोंड पाहावे लागेल!
अफगाणिस्तानच्या मुद्यावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत भारतालाही आमंत्रित केले गेल्यास भारत आणि तालिबानमध्ये ही पहिलीच औपचारिक बैठक असणार आहे. मॉस्को चर्चेनंतर अफगाणिस्तानच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी रशियाने अमेरिका, चीन आणि पाकिस्तानसोबत पुढील बैठक बोलावली आहे.

अमेरिकेचा मोठा निर्णय; सैन्य माघारीनंतर पहिल्यांदाच तालिबानसोबत करणार चर्चा
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनुसार, अफगाणिस्तानमधील दहशतवादी कारवायांवर रशियाने चिंता व्यक्त केली आहे. मॉस्कोमध्ये होणाऱ्या तालिबानसोबतच्या चर्चेत दहशतवादी कारवायांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

अफगाणिस्तान: मशिदीवरील आत्मघाती हल्ल्यात ४६ ठार; आयएसने घेतली जबाबदारी
दरम्यान, रशियाने याआधी ताजिकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमेवर तणाव वाढल्यास निर्णायक कारवाई करणार असल्याचा इशारा दिला होता. रशिया आणि ताजिकिस्तानमध्ये संरक्षण करार आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: