मुंबईत ‘बर्निंग बाइक’चा थरार; पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या २० दुचाकी जळून खाक


हायलाइट्स:

  • मुंबईत जळीतकांडने खळबळ
  • २० दुचाकी जळून खाक
  • आग लागली की लावली?; याचा शोध घेणार

मुंबईः कुर्ला येथील नेहरुनगर परिसरात २० मोटारसायकलला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मोटारसायकलला आग कशी लागली की मुद्दाम कोणीतरी मोटारसायकल जाळण्याचा प्रयत्न केला?, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. (fire broke out in 20 motorcycles in mumbai)

आज पहाटे ४च्या दरम्यान इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या जवळपास २० दुचाकींनी पेट घेतला व क्षणात ही आग वाढत गेली. या आगीत २० मोटारसायकल जळून खाक झाल्या आहेत. ही आग इतकी भीषण होती की आगीचे लोट इमारतीच्या आठव्या मजल्यापर्यंत येत होती. या घटनेमुळं नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत आग आटोक्यात आणली मात्र, या आगीत सर्वच दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. पोलिस या प्रकरणाचा अधित तपास करत असून कोणी मुद्दाम आग लावली का? याचा शोध घेत आहेत.

वाचाः ‘चीनची भारताच्या जमिनीवर पाय रोवण्यास सुरुवात; कठोर पावलं टाकली नाही तर…’

वाचाः कोळसाटंचाईमुळं लोडशेडिंगचे संकट?; उर्जामंत्र्यांनी दिली दिलासादायक माहितीSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: