फायनलच्या शेवटच्या दिवशी ICCने जाहीर केला मोठा निर्णय; …तोपर्यंत मॅच सुरूच राहणार


साउदम्प्टन: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील आज अखेरचा दिवस आहे. पहिल्या पाच दिवसात दोन दिवस पावसामुळे वाया गेल्याने आज राखीव दिवशी सामना खेळवला जाणार आहे.

वाचा- WTC Final: भारताच्या कर्णधाराने केला क्रिकेटमधील मोठा विक्रम

सामना सुरू होण्यापूर्वीच आयसीसीने पहिल्या पाच दिवसात पाऊस किंवा अन्य कारणांमुळे वेळ वाया गेला तर सहाव्या दिवशी राखीव तो वेळ भरून काढला जाईल असे सांगितले होते. आता अखेरच्या दिवशी ९८ षटकांचा खेळ होणार आहे. सहाव्या दिवशी सामना सुरू होण्यापूर्वी आयसीसीने एक मोठी घोषणा केली आहे. यानुसार जर हवामानाने साथ दिली तर ९८ षटकांचा खेळ नक्की होईल.

वाचा- चॅम्पियनशिप मिळवण्याची संधी विराटला, पण या कारणामुळे चर्चा मात्र धोनीची; पाहा व्हिडिओ

सामन्याचा अखेरचा तास तोपर्यंत सुरू होणार नाही जोपर्यंत ८३ षटके टाकली जाणार नाहीत. यासाठी गरज पडली तर वेळ वाढवली जाईल, पण कोणत्याही परिस्थितीत ९८ षटके खेळवली जातील. जर सामना टाय किंवा ड्रॉ झाला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद दिले जाणार आहे.

वाचा- WTC फायनलमध्ये धक्कादायक घटना; या खेळाडूला अपशब्द वापरले

भारताने पहिल्या डावात २१७ धावा केल्या होत्या. उत्तरा दाखल न्यूझीलंडने २४९ धावा करत ३२ धावांची आघाडी घेतली होती. काल पाचव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची विकेट गमावली होती. मैदानावर कर्णधार विराट कोहली आणि कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजारा हे दोन फलंदाज आहेत. भारताने २ बाद ६४ धावा केल्या असून त्याच्याकडे ३२ धावांची आघाडी आहे.

वाचा- अरे फायनल मॅच खेळतोय आणि तुझे काय चाललय; पाहा रोहित शर्माचा व्हिडिओSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: