धक्कादायक! मेळघाटात तरस प्राण्याचा ४ जणांवर प्राणघातक हल्ला; परिसरात खळबळ


हायलाइट्स:

  • तरस प्राण्याचा चार जणांवर प्राणघातक हल्ला
  • भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ
  • जखमींवर उपचार सुरू

अमरावती :मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अरण्यानजीक वसलेल्या आदिवासींच्या वस्त्यांमध्ये कधी वाघाचा तर कधी बिबट्याचा शिरकाव झाल्याच्या घटना अनेकदा समोर येतात. मात्र आता बिबामल इथं तरस प्राण्याने चार जणांवर प्राणघातक हल्ला चढवून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. १२ ऑक्टोबर रोजी भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रादेशिक मेळघाट वनवृत्तांर्गत येणाऱ्या बिबामल या गावशिवारात १२ ऑक्टोबर रोजी तरस प्राण्याने चांगलाचा धुमाकूळ घातला. तरसाने केलेल्या हल्ल्यात साबूलाल कासदेकर मौजीलाल कास्देकर (४०) गंभीर जखमी झाले असून त्यांचा कानही तुटला आहे. तर दुसऱ्या घटनेत सोयाबीनची सोंगणी करण्यासाठी शेतात राबणाऱ्या मजुरांवर तसराने प्राणघातक हल्ला चढवून कांचन दहीकर, समिता दहिकर व रमेश जांबेकर यांना गंभीर दुखापत केली. दोन्ही घटना थोड्याफार अंतरावरील असल्या तरी चारही जण हे बिबामल याच गावचे रहिवासी असून चौघांवर प्राथमिक आरोग्य केंद्र साद्राबाडी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर साबूलाल कासदेकर यास गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालय ( ईर्विन ) अमरावती इथं हलवण्यात आलं असून इतर तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दुसऱ्या मजल्यावरुन पडून महिलेचा मृत्यू; इमारतीत सुरू होता ‘हा’ प्रकार?

पाथपूर येथील काही पाळीव जनावरांवर देखील सदर तरसाकडून जीवघेणा हल्ला चढवल्याची माहिती गावकऱ्यांकडून देण्यात आली आहे. साबूलाल कास्‍देकर याच्या कानावर आणि मानेचे लचके तोडल्याने अधिक रक्तस्त्राव झाला. त्यामुळे अत्यवस्थ अवस्थेत त्यास प्राथमिक आरोग्य केंद्र साद्राबाडी येथून पुढे उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे हलवण्यात आले होते. तर तिघांवर वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम मालवीय यांच्या मार्गदर्शनात डॉ. सोहम उघडे हे औषधोपचार करत आहेत.

दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी डेहणकर यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र साद्रावाडी येथे पोहोचून संबधित रुग्णांसोबत व वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. घटनेचा पंचनामा करण्यासंदर्भात कर्मचार्‍यांना सूचना देण्यात आल्या असून तपासाची पुढील कारवाई सुरू केली आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: