coal shortage : वीज संकट! PM मोदींची ऊर्जा आणि कोळसा मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक


नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ( pm modi holds meeting ) मंगळवारी ऊर्जामंत्री आर. के. सिंह आणि कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत बैठक घेतली. दोन्ही मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना कोळसा पुरवठ्याच्या ताज्या ( coal shortage ) स्थितीबद्दल माहिती दिली. कोळसा संकटाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि पुढील कृती आराखड्याचा आढावा घेतला. देशात कोळशाची कमतरता नाही आणि येत्या काही दिवसांत परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे, असं दोन्ही मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना सांगितलं. सूत्रांनी ही माहिती दिली.

ऊर्जामंत्री आर. के. सिंह आणि कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत पंतप्रधान मोदींची बैठक होण्यापूर्वी आणखी एक बैठक झाली. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी दोन्ही मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक घेतली. ऊर्जा मंत्रालयाचे सचिव आलोक कुमार आणि कोळसा मंत्रालयाचे सचिव अनिल कुमार जैन यांनी कॅबिनेट सचिवांसोबत झालेल्या बैठकीत कोळशाची उपलब्धता आणि विजेच्या सद्यस्थितीवर सादरीकरण (प्रेझेंटेशन) केलं. देशात कोळशाची कुठलीही कमतरता नाही. त्यामुळे येत्या ७-१० दिवसांत वीजनिर्मिती प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा सामान्य होण्यास सुरवात होईल, अशी माहिती दोन्ही सचिवांनी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांना दिली.

cabinet decision : खतांवर अनुदान देत शेतकऱ्यांना दिलासा, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

गेल्या दोन दिवसांत १९.२० लाख टन कोळसा वीजनिर्मिती केंद्रांना पुरवला गेला आहे. तर मागणी १८.७० लाख टन इतकी आहे, असं सचिवांनी बैठकीत सांगितलं. ऊर्जा मंत्रालयाने २१ ऑक्टोबरपासून रोज २० लाख टन कोळशाची मागणी केली आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या मागणीनुसार कोळसा पुरवला जाईल आणि पुढील १५ ते २० दिवसांत वीजनिर्मिती प्रकल्पांकडील कोळशाचा साठा वाढू लागेल, असं बैठकीनंतर कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं.

coal shortage : कोळसा मंत्र्यांनी दिले उत्तर; म्हणाले, ‘…. पण राज्यांनी तसं केलं नाही’Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: