दहशतवादी हाफिज सईदच्या घराजवळ स्फोट; १५ जखमी, दोन ठार


लाहोर: मुंबई २६/११ हल्ल्याचा मास्टर माइंड दहशतवादी हाफिज सईदच्या घराबाहेर स्फोट झाला आहे. या स्फोटात १५ जण जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. हाफिज सईदचे घर लाहोरमधील जोहर टाउन भागात आहे. स्फोटाची तीव्रता मोठी होती. स्फोटानंतर घटनास्थळाजवळील इमारती, घरांच्या काचा फुटल्या. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा स्फोट कोणी केला असावा, याबाबतची कोणतीही माहिती समोर आली नाही. स्फोटाची तीव्रता मोठी असल्याचे सांगण्यात येत आहे. हाफिज सईदच्या घरावर हा पहिलाच हल्ला नाही. याआधीदेखील सईदच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे.

वाचा: कतारमध्ये भारतीय शिष्टमंडळाची तालिबानसोबत गुप्त बैठक?

प्रत्यक्षदर्शीने काय म्हटले?

एका प्रत्यक्षदर्शीने जिओ न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने मोटरसायकल घराजवळ उभी केली. त्यानंतर काही वेळेनंतर स्फोट झाला. पोलिसांनी तपासासाठी या भागाला घेरले आहे.

पाहा व्हिडिओ: इस्रायलची कमाल; लेझर गनने हवेतच पाडले ड्रोन विमान!

घटनेच्या चौकशीचे आदेश

पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुजदर यांनी या स्फोटाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी या स्फोटाची पोलीस अधिकाऱ्यांकडून प्राथमिक माहितीही घेतली आहे.


निवासी भागात हा स्फोट स्फोटानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा स्फोट गॅस पाइपलाइन, गॅस सिलेंडरचा आहे की अन्य कारणांमुळे झाला आहे, हे लगेच सांगता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मदत आणि बचाव कार्य सुरू असून स्फोटाची चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाहा: बापरे! अमेरिकन नौदलाकडून समुद्रात १८ हजार किलो बॉम्बचा स्फोट

हाफिद सईद हा लष्कर-ए-तोयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेची संस्था असलेल्या जमात-उद-दावाचा प्रमुख आहे. मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी हाफिज सईद मुख्य आरोपी आहे. हाफिज सईद भारताला हवा आहे. हाफिज सईद याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले असून त्याच्यावर १० दशलक्ष डॉलरचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: