पूजा पांडे म्हणते की उत्तान व्हिडीओ करताना मजा येते


काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेल्या आणि उत्तान व्हिडीओसाठी प्रसिद्ध असलेल्या पूनम पांडे हिला पत्रकारांनी सध्या सुरू असलेल्या हिंदुस्थान विरूद्ध न्यूझीलंड कसोटी अजिंक्यपद सामन्याविषयी विचारले. 2011 साली हिंदुस्थान विश्वचषक स्पर्धा जिंकला तर मी सगळे कपडे उतरवेन असं म्हणणारी पूनम त्यावेळी भलतीच प्रकाशझोतात आली होती.

poonam-pandey-choli-lehenga

महामुकाबल्याच्या निमित्ताने ती पुन्हा असे काही विधान करणार का, याची काही पत्रकारांना उत्सुकता होती. पूनम पांडे आणि तिचा नवरा सॅम हे दोघे गरजू लोकांना अन्नाची पाकीटे वाटण्यासाठी गेले असताना पत्रकारांनी त्यांना गाठून प्रश्न विचारले. बाकीचे प्रश्न विचारले जात असताना एका पत्रकाराने क्रिकेट सामन्याबाबत प्रश्न विचारला असता तिने म्हटले की ‘मला या सामन्याबाबत माहिती नाहीये.’ तिला मध्येच थांबवत तिच्या नवऱ्याने म्हटले की मी नग्न व्हायला तयार आहे. यावर पूनमने त्याला म्हटले की ‘तू असे केलेस तर हिंदुस्थानी संघ हरेल.’

poonam-pandey-sober-image

पूनम पांडेला बॉलीवूडमध्ये यश मिळालं नसलं तरी ती तिच्या व्हिडीओ आणि फोटोंमुळे अनेकांच्या परिचयाची झाली आहे. अंगावर एकही कपडा नसलेल्या अवस्थेतील तिचे व्हिडीओ पॉर्न साईटवरही झळकले आहेत. या व्हिडीओंबाबत बोलताना तिने म्हटलंय की ‘उत्तान व्हिडीओ करताना तिला मजा येते. माझे मित्र माझे व्हिडीओ पाहतात आणि त्यांना ते पाहताना अश्लीलता जाणवत नाही, कारण ते पॉर्न नसतात.’ माझं काम मला आवडत असून, मला माझ्या कामाबाबत अभिमान वाटतो असंही तिने म्हटलंय.

गर्भवती असल्याच्या बातम्या अफवा!

पूनम पांडे आणि सॅम या दोघांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लग्न केलं होतं. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच मारहाण करायला सुरुवात केल्याचा आरोप केला होता. पूनम पांडेने दक्षिण गोव्यातील काणकोण पोलीस स्थानकात विनयभंग आणि मारहाणीची तक्रारही नोंदवली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी पूनमचा पती सॅम बॉम्बेला अटक केली होती. पूनम ही गर्भवती असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. यावर बोलताना तिने म्हटले की माझं जीवन एका खुल्या पुस्तकाप्रमाणे अलून जर मी गर्भवती असते तर पेढे वाटले असते.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: