मास्क निर्बंध हटवणाऱ्या इस्रायलमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढली


तेल अविव: जवळपास दीड वर्षांपासून जगभरात करोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. करोनाचे निर्बंध हटवल्यानंतर बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र काही देशांमध्ये आहे. करोनाच्या वेरिएंटमुळे अनेक देश चिंतेत आहेत. मास्क वापराचे निर्बंध हटवणाऱ्या इस्रायलमध्ये बाधितांची संख्या वाढू लागली आहे. डेल्टा वेरिएंटचा संसर्ग फैलावत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मास्क निर्बंध हटवण्याचा निर्णय घेणाऱ्या इस्रायलची चिंता वाढली आहे.

इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणावर करोना लसीकरण झाले आहे. काही मोजक्या देशांमध्ये निम्म्या लोकसंख्येचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये इस्रायलचाही समावेश आहे. लसीकरणानंतर इस्रायलमध्ये मास्क वापराबाबतचे निर्बंध हटवण्यात आले होते. मात्र, त्यानंतरच्या एका आठवड्यात करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. करोना लस घेणाऱ्यांनाही डेल्टा वेरिएंटची बाधा होत आहे. करोनापासून बचाव करण्यासाठी किशोरवयीन मुलांचेही लसीकरण करण्याची मागणी करण्यात येत आहे.

वाचा:भारत सरकार-फायजरची चर्चा अंतिम टप्प्यात; लशीची ‘इतकी’ असणार किंमत?

इस्रायलमध्ये सोमवारी नवीन १२५ करोनाबाधित आढळले. एप्रिल महिन्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या प्रमाणावर बाधितांची संख्या आढळली. इस्रायलमध्ये जानेवारी महिन्यात करोनाच्या संसर्गाने जोर पकडला. त्यावेळी दररोज १० हजार बाधितांची नोंद केली जात होती. त्यानंतर सरकारने वेगाने लसीकरण करण्यास सुरूवात केली.

वाचा: करोना वेरिएंटने ‘या’ देशाची चिंता वाढवली; पुन्हा लसीकरणाची तयारी!

नऊ शिक्षकांना करोनाची बाधा

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध हटवण्यात आल्यानंतर यादृच्छिकपणे (random) करोना चाचणी करण्यात आली. या करोना चाचणी काही शाळांमध्ये करोनाबाधित आढळले. दोन शाळांमध्ये करोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या नऊ शिक्षकांना संसर्गाची लागण झाली असल्याचे समोर आले.

वाचा: करोना लस घ्या, नाहीतर तुरुंगवासाची शिक्षा; ‘या’ देशाच्या राष्ट्रपतींची धमकी

परदेशी नागरिकांमुळे डेल्टा वेरिएंट

इस्रायलचे पंतप्रधान नफ्टाली बेनेट यांनी करोनाबाधितांची संख्या वाढल्यानंतर नागरिकांना इशारा दिला आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे इस्रायलमध्ये डेल्टा वेरिएंट फैलावत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय विमानतळावर अधिक कठोरपणे चाचणी केली जाणार आहे. इस्रायलच्या नागरिकांनीही परदेशवारी कमी करण्याचे आवाहन पंतप्रधान बेनेट यांनी केले आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: