WTC Final: भारताच्या कर्णधाराने केला क्रिकेटमधील मोठा विक्रम; दिग्गजांना टाकले मागे


साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरू आहे. या सामन्याचा आज अखेरचा दिवस आहे. दोन्ही संघांना विजयाची संधी आहे. काल पाचव्या दिवशी भारताने २ बाद ६४ केल्या होत्या. कर्णधार विराट कोहली (virat kohli ) ८ तर चेतेश्वर पुजार १२ धावांवर खेळत आहे.

वाचा- वनडे, टी-२० अथवा ९८ षटके; आज अंतिम दिवस काहीही होऊ शकते

भारताचा कर्णधार विराट कोहलीने काल एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केलाय. जागतिक क्रिकेटमध्ये मोठ्या कालावधीपासून कोणत्याही फलंदाजाला मोडता न आलेला विक्रम विकाटने काल केला. आयसीसीच्या स्पर्धेतील फायनल आणि सेमीफायनलमध्ये मिळून सर्वाधिक धावा करणारा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराटने अव्वल स्थान मिळवले.

वाचा- अरे फायनल मॅच खेळतोय आणि तुझे काय चाललय; पाहा रोहितचा व्हिडिओ

आयसीसीच्या सर्व स्पर्धेतील फायनल आणि सेमीफायनलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराच्या नावावर होता. विराटने काल संगकाराचा विक्रम मागे टाकला. त्याने न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात चौथी धाव घेत हा विक्रम केला.

वाचा- Video: विराटने सापळा रचला आणि शमी-गिलने मोहीम फत्ते केली

विराटने आतापर्यंत आयसीसी वनडे वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी-२० वर्ल्डकपच्या फायनल आणि सेमीफायनल सामने खेळले आहेत. सध्या तो WTC फायनल खेळत आहे. या सर्व फायनल आणि सेमीफायनल मिळून त्याने ५३५ धावा केल्या आहेत. ज्या अन्य कोणत्याही फलंदाजापेक्षा अधिक आहेत.

वाचा- पहिल्या डावात २५० पेक्षा कमी धावा आणि भारताचा पराभव

या यादीत विराटच्यानंतर कुमार संगकाराचे नाव येते. त्याने ५३१ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग आहे त्याच्या नावावर ५०९ धावा आहेत. विराट वगळता या दोन्ही फलंदाजांनी टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळली नाही. या शिवाय विराटने अधिक फायनल आणि सेमीफायनल सामने खेळले आहेत.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: