भेटीगाठी, चर्चा सुरूच! प्रशांत किशोर तिसऱ्यांदा शरद पवारांकडे


हायलाइट्स:

  • प्रशांत किशोर तिसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला
  • राष्ट्र मंचाच्या नेत्यांसोबत काल झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भेट
  • भेटीगाठीच्या सत्रामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई/नवी दिल्ली: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीसाठी गेले आहेत. पवारांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी राष्ट्र मंचाच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर किशोर हे पवारांच्या भेटीसाठी गेल्यानं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. पवारांच्या मनात नेमकं काय चाललं आहे याचे आडाखे बांधले जात आहेत.

वाचा: ‘मुख्यमंत्र्यांची विदेशात बेकायदा संपत्ती; ईडी, सीबीआयकडे तक्रार करणार’

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे नव्या जोमानं सक्रिय झाले असून राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अलीकडंच मुंबईतील निवासस्थानी प्रशांत किशोर यांनी पवारांची भेट घेतली होती. ही भेट नेमकी कशासाठी होती, हे अखेरपर्यंत कळू शकलं नाही. प्रशांत किशोर हे आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती ठरविणार असल्याचं सुरुवातीला बोललं जात होतं. मात्र, किशोर यांनी ती चर्चा खोडून काढली होती. त्यातच मंगळवारी पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी देशातील १५ नेत्यांची बैठक झाली. यात देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं समजतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर हे आज पुन्हा एकदा पवारांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. प्रशांत किशोर यांची पवारांसोबतची ही तिसरी बैठक असल्यानं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

तिसऱ्या आघाडीची तयारी नाही!

राष्ट्र मंचाच्या नेत्यांसोबत काल झालेली बैठक ही तिसऱ्या आघाडीच्या उभारणासाठी नव्हती, हे खुद्द शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. करोनाचं संकट हाताळण्यात केंद्रातील मोदी सरकार कमी पडलं आहे. त्यामुळं लोकांमध्ये त्यांच्या विरोधात रोष आहे. मात्र, त्यामुळं मोदींचं राजकीय नुकसान किती होईल याबाबत साशंकता आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेली काँग्रेस चाचपडत आहे. केंद्र सरकारला धारेवर धरण्यात कमी पडत आहे. अशा परिस्थितीत नेमकं काय करता येईल, यावर राष्ट्र मंचासोबतच्या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांकडून समजतं.

वाचा: आदिवासी आमदारांच्या घरांवर काळे झेंडे; असं झालं काय?Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: