खोदा पहाड, निकली ‘सेक्स डॉल’, एका नजरचुकीमुळे पोलीस-अग्निशमन दलाची दमछाक


जपानच्या हाकिनोहे शहरामध्ये एक भन्नाट किस्सा घडला आहे. नदीत एका तरुणीने उडी घेतल्याची माहिती मिळताच बचाव पथक, पोलीस आणि रुग्णवाहिकेने घटनास्थळी धाव घेतली आणि तरुणीला वाचवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू झाले. परंतु बचाव पथकाने तिला वाचवले तेव्हा ती हाडामांसाची तरुणी नाही, तर रबराची सेक्स डॉल असल्याचे उघड झाले आणि सर्वांची मेहनत पाण्यात गेली.

तनाका नात्सुकी नावाचा एक युट्यूबर व्हिडीओ बनवत असताना त्याला नदी किनारी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि रुग्णवाहिका दिसली. नात्सुकीने उत्सुकतेपोटी जवळ जावून पाहिले असता त्यालाही सुरुवातीला बचाव पथक एका तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असेच वाटले. त्याला हा किस्सा आपल्या ट्विटर अकाउंटवरही शेअर केला आहे.

‘मी माझ्या युट्यूब चॅनेलसाठी फिशिंग व्हिडीओ बनवत असताना पाण्यात एक तरुणी बुडत असल्याचे आणि बचाव पथक तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. परंतु माझ्यासह तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचा हा एक गैरसमज होता’, असे ट्वीट नात्सुकीने केले.

japan-sex-doll

तो पुढे म्हणतो, याची सुरुवात फिरायला आलेल्या एका नागरिकाने पोलिसांना केलेल्या फोनमुळे झाली. सेक्स डॉलला पाहुन नदीत तरुणी बुडत असल्याचे त्या व्यक्तीने वाटले आणि त्याने तात्काळ पोलिसांना फोन लावला. काही क्षणात पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. परंतु नदीतून ‘त्या’ तरुणीला बाहेर काढण्यात आले तेव्हा सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू होते. कारण ती जिवंत तरुणी नाही, तर सेक्स डॉल होती.

sex-doll-photo

जपानच्या सेक्स इंडस्ट्रीबाबत आलेल्या एका अहवालानुसार, येथे प्रत्येक वर्षी जवळपास 2 हजार सेक्स डॉलची विक्री होती. वापर झाल्यानंतर या सेक्स डॉलची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज असते. परंतु बऱ्याचदा लोक सेक्स डॉलसोबत भावनिकरित्या जोडले गेलेले असतात. त्यामुळे कंपन्या या सेक्स डॉलचे रितीरिवाजाप्रमाणे अंतिम संस्कारही करतात. मात्र बऱ्याचदा लोक लाजेखातर त्यांना नदीत किंवा कचऱ्यातही फेकून देतात.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: