Coronavirus Vaccine करोनाच्या डेल्टासह इतर वेरिएंटवरही ‘ही’ लस प्रभावी!


मॉस्को: जगभरात पुन्हा एकदा करोनाचा संसर्ग फैलावत आहे. करोनाच्या विषाणूच्या डेल्टा वेरिएंटमुळे अनेक देशांमध्ये बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. करोनाच्या डेल्टा व इतर वेरिएंटवर ‘स्पुटनिक व्ही’ लस प्रभावी असल्याचा दावा रशियाने केला आहे. स्पुटनिक लस विकसित करणाऱ्या रशियातील गॅमलिया इन्स्टिट्यूटचे प्रमुख अलेक्झांडर गिंट्सबर्ग यांनीी हा दावा केला आहे.

करोना विषाणूच्या प्रत्येक वेरिएंट, म्युटेशनवर स्पुटनिक व्ही लस प्रभावी असल्याचे त्यांनी म्हटले. स्पुटनिक लशीमुळे डेल्टा वेरिएंटपासून इतर वेरिएंटच्या विषाणूंविरोधात लढण्यासाठी शरिरात पुरेशी रोगप्रतिकारक शक्ती, अॅण्टीबॉडी विकसित होत असल्याचे त्यांनी म्हटले.

वाचा:करोना वेरिएंटने ‘या’ देशाची चिंता वाढवली; पुन्हा लसीकरणाची तयारी!
वाचा:भारत सरकार-फायजरची चर्चा अंतिम टप्प्यात; लशीची ‘इतकी’ असणार किंमत?

वाचा: करोना लस घ्या, नाहीतर तुरुंगवासाची शिक्षा; ‘या’ देशाच्या राष्ट्रपतींची धमकी

भारतात स्पुटनिकची प्रतीक्षा वाढणार?

भारतीयांना स्पुटनिक व्ही लशीची प्रतीक्षा आणखी काही काळ करावी लागणार आहे. अपोलो रुग्णालयात २० जूनपासून स्पुटनिक व्ही लस देण्यात येणार होती. मात्र, रुग्णालय प्रशासनाने हा निर्णय पुढे ढकलला. लस पुरवठा किती होणार, हे ठरल्यानंतर लसीकरण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. भारताने मंजुरी दिलेली स्पुटनिक व्ही ही लस पहिली परदेशी लस आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram