Petrol Price Today इंधन दर ; जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव


हायलाइट्स:

  • मागीत दोन महिन्यात कंपन्यांनी तब्बल २९ वेळा दरवाढ केली आहे.
  • अनेक शहरांत पेट्रोलने शंभरी गाठली तर डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचले.
  • आज बुधवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवले.

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुका संपताच पेट्रोलियम कंपन्यांनी सुरु केलेली इंधन दरवाढ अद्याप थांबलेली नाही. मागीत दोन महिन्यात कंपन्यांनी तब्बल २९ वेळा दरवाढ केली आहे. ज्यामुळे अनेक शहरांत पेट्रोलने शंभरी गाठली तर डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. आज बुधवारी कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले.

वर्षभरात दुसऱ्यांदा वेतनवाढ ; या कंपनीनं दिला कर्मचाऱ्यांना सुखद धक्का
कंपन्याकडून एक दिवसआड दरवाढ केली जात आहे. रविवारी कंपन्यांनी पेट्रोल दरात २९ पैसे वाढ केली होती तर डिझेलमध्ये २८ पैशांची वृद्धी केली होती. त्यानंतर सोमवारी कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले होते. तर काल मंगळवारी पेट्रोल २८ पैशानं आणि डिझेल २६ पैशांनी महागले होते.

खरेदीची ‘सुवर्ण’संधी! आठवडाभरात सोनं झालं दोन हजारांनी स्वस्त
आज बुधवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०३.६३ रुपये इतका वाढला आहे. दिल्लीत पेट्रोल ९७.५० रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोलसाठी ९८.६५ रुपये भाव आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ९७.३८ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०५ रुपयांवर गेला आहे.

विजय मल्ल्याला दणका ; कर्ज वसुलीसाठी बँकांनी घेतला हा मोठा निर्णय
मुंबईत डिझेलचा आजचा भाव ९५.७२ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ८८.२३ रुपये आहे. चेन्नईत ९२.८३ रुपये आणि कोलकात्यात ९१.०८ रुपये डिझेलचा भाव आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९६.९३ रुपये आहे. देशात सर्वात महाग डिझेल भोपाळमध्ये मिळत आहे.

जागतिक कमाॅडिटी बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे किंमतींवर दबाव निर्माण झाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूटने जारी केलेल्या आकडेवारीनुसार १८ जूनअखेरच्या आठवड्यात ७.१९९ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचा साठा आहे. काल मंगळवारी कच्च्या तेलाचा भाव ०.११ डाॅलरने वधारला आणि ७४.८१ डाॅलर प्रती बॅरल झाला. यूएस टेक्सासमध्ये डब्लूटीआय क्रू़डचा भाव ०.४६ डाॅलरने वधारला आणि ७३.६६ डाॅलर प्रती बॅरल झाला.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: