IND vs NZ WTC Final: वनडे, टी-२० अथवा ९८ षटके; आज अंतिम दिवस काहीही होऊ शकते


साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल लढत सुरू आहे. पहिल्या आणि चौथ्या दिवसाचा संपूर्ण खेळ वाया गेला. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी देखील पूर्ण षटकांचा खेळ न झाल्याने आयसीसीच्या नियमानुसार आज राखीव दिवशी ९८ षटक टाकली जातील.

वाचा- अरे फायनल मॅच खेळतोय आणि तुझे काय चाललय; पाहा रोहित शर्माचा व्हिडिओ

टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल अशा स्थितीत आहे की सामना ड्रॉ देखील होऊ शकतो किंवा दोन्ही पैकी एका संघाला विजेतेपद देखील मिळू शकते. यातील सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे सहाव्या दिवशी पावसाची शक्यता नाही. त्यामुळे आज दिवसभर पूर्ण षटके खेळवली जातील. भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत न्यूझीलंडला २४९ धावांत गुंडाळले. त्यांनी पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी घेतली. पाचव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने २ बाद ६४ धावा केल्या होत्या.

वाचा- WTC Final ड्रॉ झाल्यास टीम इंडियाचे नुकसान; न्यूझीलंडचा होणार हा फायदा

विजयासाठी ही गोष्ट करावी लागले

कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा ही जोडी सध्या मैदानावर आहे. या दोन्ही अनुभवी फलंदाजांकडून भारताला मोठ्या अपेक्षा असतील. जर भारत विजय मिळवण्याच्या दृष्टीने खेळत असेल तर त्यांना वेगाने धावा कराव्या लागतील. सध्या पुजारा १२ तर विराट ८ धावांवर खेळत आहे. या शिवाय भारताला उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या आधी ऋषभ पंतला फलंदाजीला पाठवावे लागले. जर भारताने न्यूझीलंडसमोर १८० ते २०० धावांचे लक्ष्य ठेवले तर गोलंदाजांवर सर्व जबाबदारी येईल. भारतीय फलंदाजांना हे देखील लक्षात ठेवावे लागले ती त्यांनी गोलंदाजांना १० विकेट घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. जर कसोटी ड्रॉ झाली तर दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद मिळले.

न्यूझीलंडकडे देखील संधी

भारताकडे ३२ धावांची आघाडी आहे आणि आठ विकेट शिल्लक आहेत. जर न्यूझीलंडने भारताच्या फलंदाजांना लवकर बाद केले तर त्यांना विजय मिळवता येऊ शकतो. भारताला १५० धावांपर्यंत रोखले तर न्यूझीलंडला विजयाची संधी आहे. अशा परिस्थितीत त्यांनी वेगाने धावा कराव्या लागतील.

वाचा- Video: विराटने सापळा रचला आणि शमी-गिलने मोहीम फत्ते केली

कसे असेल हवामान

राखीव दिवशी पावसाची कोणतीही शक्यता नाही. मैदानावर उन असेल. सामन्याचा पहिला आणि चौथा दिवस पावसामुळे वाया गेला होता. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी खराब प्रकाशामुळे पूर्ण वेळ खेळ झाला नाही.

पाचव्या दिवशी १० विकेट पडल्या

काल पाचव्या दिवशी पावसामुळे अर्धातास उशिरा खेळ सुरू झाला. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला २४९ धावांवर बाद केले. भारताकडून मोहम्मद शमीने ४ विकेट घेतल्या. त्याने २६ षटकात ८ मेडन टाकल्या. तर इशांत शर्माने २५ षटकात ९ मेडन ओव्हरसह ३ विकेट घेतल्या. काल दिवसभरात १० विकेट पडल्या त्यातील २ भारताच्या तर ८ न्यूझीलंडच्या होत्या.

वाचा- पहिल्या डावात २५० पेक्षा कमी धावा आणि भारताचा पराभव

रेकॉर्ड भारताच्या विरुद्ध

भारतीय संघाने पहिल्या डावात २५० पेक्षा कमी धावा केल्यावर अधिक तर वेळा त्यांचा पराभव झालाय. अशा ९३ पैकी ५४ कसोटीत पराभव तर २० मध्ये विजय मिळाला आहे.

वाचा- फक्त मैदानावरील कामगिरीने नव्हे तर सौंदर्याने घायाळ करणारी भारताची क्रिकेटपटू

विजेत्याला मिळणार १२ कोटी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकणाऱ्या संघाला १.६ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे १२ कोटी रुपये मिळणार आहेत. तर उपविजेच्या संघाला ६ कोटी रुपये मिळतील. जर सामना ड्रॉ झाल्यास ही रक्कम निम्मी निम्मी दिली जाईल.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: