मिरे अॅसेट फाऊंडेशनची विशेष लसीकरण मोहीम


कोविड 19 च्या महामारीविरुद्ध लढण्यासाठी मिरे अॅसेट फाऊंडेशनने 15 हजार मुंबईकरांचे मोफत लसीकरण करण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. लसीकरणासाठी मिरे फाऊंडेशनने वांद्रे येथील होली फॅमिली हॉस्पिटल तसेच नानावटी मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे सहकार्य घेतले आहे. नानावटी मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील लसीकरण हे प्रत्यक्षात विलेपार्ले पश्चिम येथील जमनाबाई नरसी स्कूलमध्ये केले जाणार आहे. मोफत लसीकरणाच्या या मोहिमेतून मुंबईतील लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्यास मदत केली जाणार असल्याची माहिती मिरे अॅसेट फाऊंडेशनचे संचालक रितेश पटेल यांनी दिली. मिरे फाऊंडेशनच्या या मदतीमुळे किमान दहा हजार नागरिकांना चाचण्यांच्या माध्यमातून फायदा झाला आहे.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: