कृषी संशोधनात गुंतवणूक संधी;’इंडिया पेस्टिसाइड्स लिमिटेड’चा आयपीओ आजपासून खुला


हायलाइट्स:

  • इंडिया पेस्टिसाइड्स लिमिटेडचा आयपीओ २३ जून रोजी खुला होईल व २५ जून २०२१ रोजी बंद होईल
  • या आॅफरसाठी प्रती इक्विटी शेअर २९० ते २९६ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.
  • किरकोळ गुंतवणूकदारांना किमान ५० शेअरसाठी बोली लावता येईल.

मुंबई : संशोधन व विकासावर आधारीत टेक्निलकल्सची निर्मिती करणारी ‘इंडिया पेस्टिसाइड्स लिमिटेड’ने भांडवल उभारणीचा निर्णय घेतला आहे. कंपनीने ८०० कोटींचे शेअर विक्री करण्याची घोषणा केली असून आजपासून हा आयपीओ खुला झाला आहे.

‘इंडिया पेस्टिसाइड्स लिमिटेड’ ही कृषी-रासायनिक आणि टेक्निलकल्सच्या निर्मितीच्या व्हॉल्यूमचा विचार करता सर्वात वेगाने वाढणारी कृषी-रासायनिक कंपनी आहे. या कंपनीने आज बुधवार २३ जून २०२१ रोजी त्यांच्या इक्विटी शेअर्सचे (आॅफर) पब्लिक ऑफरिंगसाठी खुली केली असून ही आॅफर २५ जून २०२१ रोजी बंद होणार आहे. या आॅफरसाठी प्रती इक्विटी शेअर २९० ते २९६ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान ५० शेअरसाठी बोली लावता येईल.

वाचा : खरेदीची ‘सुवर्ण’संधी! आठवडाभरात सोनं झालं दोन हजारांनी स्वस्त
एकूण ८०० कोटीपर्यंत शेअर्सची विक्री केली जाणार आहे. ज्यात १०० कोटींचे नवीन इक्विटी शेअर्स आणि इक्विटी शेअरची विक्रीची ऑफर ७०० कोटीपर्यंत आहे. जी विक्री करणाऱ्या शेअरहोल्डरकडून आहे. ताज्या इश्युमधून संकलित होणाऱ्या निधीचा वापर खेळत्या भांडवलाच्या आवश्यकता आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी करण्यात येणार असल्याचे कंपनीने माहितीपत्रकात म्हटलं आहे.

वर्षभरात दुसऱ्यांदा वेतनवाढ ; या कंपनीनं दिला कर्मचाऱ्यांना सुखद धक्का
ही कंपनी पाच टेक्निकल्सची एकमेव भारतीय उत्पादक आहे आणि उत्पादन क्षमतेच्या बाबतीत कॅप्टन, फोल्पेट आणि थिओकार्बामेट हर्बिसाइट यांचे जागतिक पातळीवर आघाडीचे उत्पादक आहेत. (स्रोत : एफ अँड एस रिपोर्ट्स*). कंपनी निर्मिती करत असलेल्या काही महत्त्वाच्या फंजिसाइड टेक्निकल्समध्ये पुढील उत्पादनांचा समावेश होतो : (i) फोल्पेट, जे विनयार्ड्स, तृणधान्ये, पिके आणि पेंट्समधील बायोसाइडमध्ये बुरशीजन्य वाढ नियंत्रित करणारी बुरशीनाशके तयार करण्यासाठी वापरले जाते; आणि (ii) सायमॉक्सॅनिल, जे द्राक्षे, बटाटे, भाज्या आणि इतर अनेक पिकांवर होणाऱ्या तंतु भुरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बुरशीनाशकाच्या निर्मितीमध्ये वापरण्यात येते. कंपनीतर्फे निर्मिती करण्यात येणाऱ्या प्रमुख हर्बिसाइड टेक्निकल्समध्ये थिओकार्बामेट हर्बिसाइडचा समावेश आहे. याचा उपयोग गहू आणि तांदळांच्या पिकांच्या बाबतीत करण्यात येतो आणि जागतिक पातळीवर याचा वापर होतो.

विजय मल्ल्याला दणका ; कर्ज वसुलीसाठी बँकांनी घेतला हा मोठा निर्णय
ही ऑफ बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून करण्यात आली असून यात ५० टक्क्यांहून अधिक ऑफर क्वालिफाइड इन्स्टिट्युशनल खरेदीदारांना वाटपासाठी उपलब्ध नसेल आणि नॉन इन्स्टिट्युशनल खरेदीदारांना वाटप करण्यासाठी १५ टक्क्यांहून कमी ऑफर उपलब्ध नसेल आणि रिटेल वैयक्तिक बिडर्सना वाटप करण्यासाठी ३५ टक्क्यांहून कमी ऑफर उपलब्ध नसेल.

कंपनीकडे २२ कृषि-रासायनिक टेक्निकल्ससाठी नोंदणी आणि परवाने
उत्तरप्रदेशमधील लखनौ आणि हरदोई येथील दोन कारखान्यांच्या माध्यमातून सध्या कंपनीचे काम सुरू आहे. या कारखान्यांची टेक्निकल्ससाठीची क्षमता १९५०० मेट्रिक टन आहे आणि फॉर्म्युलेशन व्हर्टिकलची क्षमता ६५०० मेट्रिक टन इतकी आहे. त्यांच्याकडे सध्या २२ कृषि-रासायनिक टेक्निकल्ससाठी नोंदणी आणि परवाने आहेत आणि भारतात विक्री करण्यासाठी १२५ रससूत्रे (फॉर्म्यूलेशन्स) आहेत आणि निर्यातीसाठी २७ कृषी रासायनिक टेक्निकल्स आणि ३५ रससूत्रे (फॉर्म्युलेशन्स) आहेत.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: