‘मुख्यमंत्र्यांची विदेशात बेकायदा संपत्ती; ईडी, सीबीआयकडे तक्रार करणार’


हायलाइट्स:

  • राणा दाम्पत्य शिवसेनेविरोधात आक्रमक
  • आमदार रवी राणा यांनी केले मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
  • ईडी आणि सीबीआयकडं तक्रारी करण्याचा दिला इशारा

अमरावती: खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचं जातप्रमाणपत्र रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर राणा दाम्पत्य शिवसेनेविरोधात कमालीचं आक्रमक झालं आहे. नवनीत राणा यांच्यानंतर आता त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लक्ष्य केलं आहे. ‘मुख्यमंत्री ठाकरे यांची विदेशात मोठी बेकायदा संपत्ती असून त्याविरोधात ईडी व सीबीआयकडं तक्रार करणार आहे’, असा इशारा राणा यांनी दिला आहे.

वाचा: संजय राऊत यांच्याविरुद्धच्या तक्रारींविषयी अहवाल द्या; हायकोर्ट

रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांसह माजी खासदार आनंदराव अडसूळ व परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘सुमारे ८ वर्षांपूर्वी नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात सातत्यानं तक्रारी केल्या. अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडं तक्रार केली. तिथं नवनीत राणा जिंकल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्थापन झालेल्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे २०१३ साली तक्रार केली. तिथंही नवनीत जिंकल्या. ह्या सगळ्या निर्णयानंतरही हायकोर्टानं दिलेला जातप्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं योग्य न्याय देत अंतिम निर्णयापर्यंत स्थगिती दिली. त्यामुळं आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे,’ असं राणा म्हणाले. आता आम्ही स्वातंत्र्यापूर्वीपासूनची जवळपास २०० हून अधिक कागदपत्रे न्यायालयात सादर करणार आहोत. जेणेकरून ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होऊन जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

वाचा: आता कार्यकर्तेही अजित पवारांचे ऐकत नाहीत; भाजप नेत्याचा टोला

‘मुख्यमंत्र्यांवर आरोप करताना रवी राणा म्हणाले, ‘मुख्यमंत्री स्वत: अॅड. अनिल परब यांच्या माध्यमातून नवनीत राणा यांना टार्गेट करत आहेत. ते द्वेषाचं राजकारण करत आहेत. मी स्वत: उद्धव ठाकरे यांच्या विदेशातील बेकायदा संपत्तीची, जमिनींची व घरांची माहिती घेतली आहे. ही सर्व माहिती ईडी आणि सीबीआयला देणार आहे व तातडीनं कारवाईची मागणी करणार आहे,’ असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. त्याशिवाय, अनिल परब यांनी अलीकडंच एका बेकायदा रिसॉर्टचं बांधकाम केलंय. स्वत:च्या नावावर ते करून घेतलंय. याचीही माहिती मी घेतली असून त्याविषयी देखील तक्रार करणार आहे,’ असा इशारा राणा यांनी दिला आहे.

जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणी खासदार नवनीत राणा यांना दिलासाSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: