मोदीच पुन्हा येतील , देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार


नवी दिल्लीत तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न होत आहे. पण त्याचा काहीही परिणाम होणार नाही. आतापेक्षा अधिक जागा जिंकून 2024मधील निवडणुकीत नरेंद्र मोदीच निवडून येतील असा दावा विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा केला.

दिल्लीत सध्या तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न होतो आहे, याबाबतच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2019 मध्ये सुद्धा याहीपेक्षा अधिक नेते पश्चिम बंगालमध्ये एकमेकांच्या हातात हात घालून उभे होते. परिणाम सर्वांना माहिती आहे असा दावा केला.

दोन दिवसांच्या अधिवेशनाचा निर्णय दुर्दैवी

विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, शेतकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी, विविध समाजबांधव यांचे अनेक प्रश्न मंगळवारी ऐरणीवर असताना, मराठा तसेच ओबीसी आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची मागणी होत असताना विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसांचे घेण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: