WTC FINAL : जसप्रीत बुमरा पहिले षटक टाकल्यावर पेव्हेलियनमध्ये धावत का गेला, कोणती चुक घडली पाहा….


साऊदम्पटन : फायनचल्या पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने पहिले षटक टाकले. पण पहिले षटक टाकल्यावर बुमरा पेव्हेलियनमध्ये धावत गेला. यावेळी बुमराकडून एक मोठी चुक घडली होती. ही चुक सुधारण्यासाठी बुमरा पेव्हेलियनमध्ये धावून गेल्याचे पाहायला मिळाले.

बुमराकडून नेमकी कोणती मोठी चुक झाली, पाहा…
फायनलच्या पाचव्या दिवसाचा खेळ थोड्या उशिराने सुरु झाला. यावेळी भारताच्या डावाची सुरुवात बुमराने केली. बुमराच्या या षटकात फक्त एक धाव निघाली. पण हे षटक पूर्ण झाल्यावर आपल्याकडून एक मोठी चुक झाल्याचे बुमराच्या लक्षात आले. बुमराने यावेळी जे टी-शर्ट घातले होते, ते नियमित सामन्यांचे होते. पण फायनलसाठी वेगळे किट दोन्ही संघांना देण्यात आले आहे. भारताच्या नियमित टी-शर्टवर बायजू या कंपनीचा लोगो आहे, तर विश्व अजिंक्यपद कसोटी फायनलच्या टी-शर्टवर देशाचे नाव कोरलेले आहे. बुमराने आपले नियमित कपडे घातले होते, त्यामुळे ही चुक लक्षात आल्यावर बुमरा हा पेव्हेलियनमध्ये धावत गेला आणि नवीन टी-शर्ट घालून आल्याचे पाहायला मिळाले.


सामन्याचा निकाल काय लागू शकतो, जाणून घ्या शक्यता…
सामन्याचा आजचा पाचवा दिवस आहे. त्यामुळे सामन्याचा निकाल काय लागू शकतो याबाबतच्या शक्यता आता पुढे आल्यावर आहेत. सामना ड्रॉ होऊ शकतो, यामध्ये न्यूझीलंड आज दिवसभरात फलंदाजी करले आणि भारताच्या धावसंख्येच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. उद्या पहिले सत्र झाल्यानंतर ते डाव जाहीर करतील. त्यानंतर भारताकडे दोन सत्र असतील ज्यात ते कसोटी वाचवतील. दुसरी शक्यता- यामध्ये न्यूझीलंड वेगाने धावा करून भारतावर १७० किंवा २०० धावांची आघाडी घेऊन डाव जाहीर करतील. त्यानंतर ते भारताला फलंदाजी देतील तसेच उद्या दिवसभरात ऑल आउट करून एका डावाने सामना जिंकतील. तिसरी शक्यता- यामध्ये भारताची गोलंदाज अतिशय शानदार कामगिरी करतील आणि आज टी टाइमच्या आधी न्यूझीलंडचा ऑल आउट करतील. त्यानंतर आजच्या शेवटच्या सत्रात आणि उद्या लंचपर्यंत फलंदाजी करून न्यूझीलंड समोर एक आव्हानात्मक धावसंख्या देतील. त्यानंतर उर्वरीत दोन सत्रात न्यूझीलंडला ५० षटकात बाद करून भारत कसोटीत विजय मिळवेल. त्यामुळे आताच्या घडीला तिन्हीही शक्यता सत्यात उतरू शकतात, असेच दिसत आहे.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: