BHR गैरव्यवहार: पोलीस चौकशीत आणखी नावे आली समोर


हायलाइट्स:

  • बीएचआर प्रकरणी अटकेतील सर्वांना न्यायालयीन कोठडी.
  • पुणे आर्थिक गुन्हे शाखेने सात जणांना केली आहे अटक.
  • तपासात सहकार्य मिळत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे.

जळगाव: बीएचआर पतसंस्थेतील अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सात दिवसांपूर्वी जळगावातून हॉटेल व्यवसायिक भागवत भंगाळे, दाल असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम कोगटा, जामनेर मधील राजकीय पक्षांशी संबध असलेल्या बड्या हस्ती अशा एकूण ११ कर्जदारांना अटक केली. पोलीस कोठडी संपल्याने या सर्व ११ जणांना मंगळवारी पुणे न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून सर्वांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस चौकशीत आणखी काही नावे समोर आली आहेत. BHR Fraud Case Latest Update )

वाचा: धक्कादायक: BMCच्या राजावाडी रुग्णालयात उंदराने कुरतडले रुग्णाचे डोळे

भागवत भंगाळे, प्रेम कोगटा, जयश्री तोतला, अंबादास मानकापे, छगन झाल्टे, जितेंद्र पाटील, आसिफ तेली, जयश्री मणियार, संजय तोतला, राजेश लोढा, प्रितेश जैन हे ११ संशयित सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. या ११ जणांनी सुमारे १७ कोटी रुपयांचे कर्ज ठेवीदारांच्या पावत्यांवर मॅचिंग केल्याचा आरोप आहे. सहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांची सविस्तर चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या संशयितांनी पोलिसांना अर्धवट माहिती, उडवाउडवीची उत्तरे दिली. या गुन्ह्यात बेपत्ता असलेले मुख्य संशयित सुनील झंवर, जितेंद्र कंडारे यांना आपण ओळखतो, भेट झाल्याचेही मान्य केले. मात्र, बनावट कागदपत्रांच्या बाबतीत पोलिसांना त्यांनी परीपूर्ण माहिती दिली नाही. दरम्यान संशयितांच्या चौकशीत काही नवीन एजंटची नावे समोर आली असल्याने त्यांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.

वाचा: पंढरपुरात १७ ते २५ जुलैपर्यंत संचारबंदी?; आषाढी यात्रेआधी मोठा निर्णय

पोलीस कोठडी संपल्याने आज मंगळवारी न्यायालयासमोर या सर्वांना हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी पुन्हा एकदा सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. सुनावणीअंती न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सरकार पक्षातर्फे अॅड. प्रवीण चव्हाण तर त्रयस्त अर्जदार म्हणून अॅड. अक्षता नायक यांनी युक्तिवाद केला.

वाचा:शिवसेना-राष्ट्रवादी युतीचा ‘नगर’नामा!; मुंबईतील बैठकीत झाला मोठा निर्णयSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: