हिंदुस्थानी संशोधकांनी शोधले चार लघुग्रह


हिंदुस्थानी संशोधकांनी पृथ्वीजवळ असलेल्या चार नव्या लघुग्रहांचा शोध लावला आहे. एका प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत सहा जणांच्या टीमने घेतलेल्या मेहनतीचे हे यश आहे.

संशोधकांच्या टीमचे नेतृत्व मिका सुसत्या रेखा या शिक्षिकेने केले. रेखा या आंध्र प्रदेशातील शाळेत शिकवतात. त्यांना यापूर्वी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रेखा यांच्या व्यतिरिक्त कडप्पा जिह्यातील किरण कुमार रेड्डी, विजयवाडाचे एम. सुरेश, चित्तूरचे नीलकांती यांचा टीममध्ये समावेश होता. या संशोधनासाठी विजय भारती संघटनेने मदत केली. सत्पर्षी इंडिया अॅस्टेरॉईड पॅम्पेनच्या बॅनरखाली सुमारे 45 दिवस या टीमने अथक परिश्रम केले. त्यासाठी रॅपिड रिस्पॉन्स सिस्टीम आणि पॅनोरमिक सर्व्हे  टेलिस्कोपचा डेटा आणि फोटोंचाही वापर केला.

लघुग्रह (अॅस्ट्रेरॉईड) म्हणजे पृथ्वीच्या आसपास जमा झालेले दगड. ते पृथ्वीच्या कक्षेजवळ असतात. पृथ्वीच्या जवळ असणाऱया वस्तूंना लघुग्रह म्हटले जाते. त्यात काही धूमकेतू असतात. पृथ्वीच्या जवळ कमीत कमी 25 हजारांहून अधिक लघुग्रह तर सुमारे 100 धूमकेतू असल्याचा अंदाज आहे.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: