वाहतूककोंडीचा प्रश्न सुटला, प्रकल्पग्रस्तांचे दिंडोशीमध्येच झाले पुनर्वसन, संरक्षक भिंतीमुळे सुरक्षा


मालाड पूर्व हुमेरा पार्क येथील रस्ता खुला केल्याने वाहतुकीचा प्रश्न सुटला असून रस्ता रुंदीकरणातील 80 प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन दिंडोशीतीलच कुरार गाव येथील ‘एसआरए’मध्ये करण्यात आले व उर्वरित 16 निवासी घरांचे लगतच्या एसआरए’मध्ये व 5 व्यावसायिक गाळ्यांचे स्थलांतर करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. या शिवाय पोयसर नदी रुंदीकरण आणि संरक्षक भिंतीचे कामही पूर्ण झाल्याने शेकडो रहिवाशांची सुरक्षा मजबूत झाली आहे. शिवाय पोयसर नदीपात्र रुंदीकरणातील प्रकल्पग्रस्तांना आप्पा पाडा येथे 269 चौरस फुटांचे हक्काचे घर मिळाले आहे. या विकासकामांमुळे कुरारवासीयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. या विकासकामांसाठी शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सुनील प्रभू यांनी पाठपुरावा केला.

पोयसर नदीच्या पुराचे पाणी खाली असलेल्या क्रांतिनगर, आप्पा पाडा, आनंदेय नगर, गांधीनगर येथील रहिवाशांच्या घरात शिरण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे मिठी नदीसह दहिसर, पोयसर, वालभट या इतर नद्यांचे पात्र रुंद करून संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मात्र पोयसर नदी रुंदीकरणात 200 घरे बाधित होत होती. या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन मानखुर्द येथे करण्यास रहिवाशांचा प्रचंड विरोध होता. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आप्पा पाडा येथील ‘एमएमआरडीए’ने विकसित केलेल्या इमारतीत करावे यासाठी आमदार सुनील प्रभू यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठका झाल्या. यानुसार ‘एसआरए’ने ‘पीएपी’ची घरे लवकरात लवकर पालिकेच्या ताब्यात द्यावीत अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी ‘एसआरए’चे मुख्य अधिकारी लोखंडे यांना दिल्या होत्या.

हक्काचे घर मिळाले, पुराचा धोकाही टळला

आप्पा पाडा येथे घर मिळालेल्या 129 प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर 3/11 अंतर्गत करण्यात आले आहे. तर उर्वरित बाधितांपैकी 34 प्रकल्पग्रस्तांना ‘एसआरए’कडून देण्यात आलेल्या घरांचे वाटप करण्यात आले. तर उर्वरित बांधितांना घरे देण्यासाठी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आवश्यक कार्यवाही सुरू आहे. शिवाय नदीचे रुंदीकरण आणि संरक्षक भिंतीचे कामदेखील पूर्ण झाले आहे. त्यामुळे रहिवाशांचा पुराचा धोकाही टळला असून प्रवाहासोबत वस्तू वाहून जाण्याचा धोकाही टळला आहे. कुरार गाव ते दिंडोशी बस डेपो हुमेरा पार्क येथील रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्याने वाहतूक काकोंडी फुटणार आहे.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: