Video: विराटने सापळा रचला आणि शमी-गिलने मोहीम फत्ते केलीसाउदम्प्टन: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. कर्णधार केन विलियमसन आणि अनुभवी फलंदाज यांनी न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली होती. त्यांनी १ बाद १०१ धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली.

वाचा-

फायनल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना फार प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. पण आज पाचव्या दिवशी भारताच्या जलद गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या या दोन्ही अनुभवी फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले. धावा न मिळाल्यामुळे फलंदाज दबावात आले आणि त्यातच मोहम्मद शमीने संधी साधली.

वाचा-

न्यूझीलंडच्या डावातील ६३व्या षटकात मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर अनुभवी रॉस टेलरला बाद केले. शुभमन गिलने कव्हर्समध्ये शानदार असा कॅच घेतला. गिलने उजव्या बाजूला हवेत उडी मारून कॅच घेतला.

वाचा-

विकेट घेण्याआधी ड्रिंक ब्रेकमध्ये कर्णधार विराट कोहली शमीला काही गोष्टी समजवून सांगत होता. त्यानंतर पहिल्याच चेंडूवर शमीने रॉस टेलरला बाद केले. त्याने ३७ चेंडूत ११ धावा केल्या.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: