WTC Final ड्रॉ झाल्यास टीम इंडियाचे नुकसान; न्यूझीलंडचा होणार हा फायदा


साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून क्रिकेट विश्वाला या फायनल मॅचची प्रतिक्षा होती. पण पावसाने सर्वांची निराशा केली.

वाचा- Video: विराटने सापळा रचला आणि शमी-गिलने मोहीम फत्ते केली

फायनल सामन्यातील पहिल्या चार पैकी दोन दिवसांचा खेळ वाया गेला. पहिल्या आणि चौथ्या दिवशी एकही चेंडू टाकता आला नाही. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पूर्ण ९० षटकांचा खेळ होऊ शकला नाही. आता पाचव्या दिवशी आणि सहाव्या दिवशी संपूर्ण वेळ मॅच होण्याची आशा आहे. भारताने पहिल्या डावात २१७ धावा केल्या असून न्यूझीलंडने पाचव्या दिवशी दुसऱ्या सत्रात ६ बाद १६२ धावा केल्या होत्या.

वाचा- दोन दिवसात काय होऊ शकते WTC Final मध्ये; या ३ शक्यता आहेत

दोन्ही संघातील ही लढत ड्रॉ होण्याची शक्यता अधिक आहे. अशात परिस्थितीत भारत आणि न्यूझीलंड यांना संयुक्त विजेतेपद दिले जाईल.

वाचा- WTC विजेतेपद कोणाला? सुनील गावस्कर म्हणाले, ICCने मार्ग काढावा

जर ही लढत ड्रॉ झाली तर भारतीय संघाचे नुकसान अधिक होईल. कारण संयुक्त विजेतेपद मिळाल्यानंतर भारतीय संघाला आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवण्याची संधी जाईल. भारत दुसऱ्या स्थानावर राहिल. त्याचे १२२ गुण असतील तर न्यूझीलंड १२३ गुणांसह पहिल्या स्थानावर कायम राहतील.

वाचा- फक्त मैदानावरील कामगिरीने नव्हे तर सौंदर्याने घायाळ करणारी भारताची क्रिकेटपटू

या उलट जर भारताने विजय मिळवला तर विजेतेपदासह क्रमवारीत भारताला फायदा होईल. भारताचे १२४ गुण होतील आणि ते न्यूझीलंडला मागे टाकत पहिल्या स्थानावर पोहोचतील. न्यूझीलंड १२१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर जातील.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: