कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा; पाकिस्तान कोर्टाने दिले ‘हे’ निर्देश


इस्लामाबाद: कथित हेरगिरी प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा झालेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान कोर्टाने दिलासा दिला आहे. कोर्टाने मंगळवारी कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नियुक्त करण्यासाठी भारतासाठी आणखी वेळ दिला आहे. लष्करी कोर्टाने दिलेल्या शिक्षेच्या निर्णयाची कोर्टात फेरआढावा घेतला जाणार आहे.

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असलेले कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली एप्रिल २०१७ मध्ये दोषी ठरवले होते. या गुन्ह्यांसाठी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नियुक्त करण्याबाबत सुनावणी केली. या खंडपीठात मुख्य न्यायाधीश अतहर मिनल्लाह, न्या. आमेर फारुख आणि न्या. मियांगुल हसन औरंगजेब यांचा समावेश आहे. पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल खालिद जावेद खान यांनी म्हटले की, पाच मे रोजी कोर्टाने एका आदेशाद्वारे वकील नियुक्तीसाठी भारताशी संपर्क साधण्यासाठी एक प्रयत्न करण्यास सांगितले होते. भारताला या निर्णयाबाबत कळवले होते. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नसल्याचे अॅटर्नी जनरल खान यांनी म्हटले. खान यांनी म्हटले की, भारताला एका स्वतंत्र खोलीत जाधव आणि राजनियकासोबत बैठक करायची आहे. मात्र, भारतीय प्रतिनिधीसोबत स्वतंत्र बैठक करू देण्याची जोखीम पाकिस्तानी अधिकारी उचलू शकत नसल्याचे खान यांनी कोर्टाला सांगितले. फक्त हस्तांदोलन केले तरी जाधव यांच्या जीवाला धोका संभवू शकतो असेही त्यांनी म्हटले.

पँडोरा गौप्यस्फोट: पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधक अडचणीत
भारत जाधव यांच्यासाठी बाहेरून एका वकिलाची नियुक्ती करू इच्छितो. मात्र, पाकिस्तानचा कायदा त्यासाठी मंजुरी देत नाही. भारताचा कायदाही असाच असल्याचे खान यांनी कोर्टात सांगितले.

‘टीटीपी’चा पाकिस्तानच्या सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला; पाच जवान ठार
पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयाला लागू करायचे असल्याचे मुख्य न्यायाधीश मिनल्लाह यांनी म्हटले. कुलभूषण जाधव आणि भारत सरकारला आणखी एक स्मरण पत्र पाठवण्यात यावे. भारताला काही आक्षेप असल्यास त्यांनी कोर्टात भूमिका मांडावी. भारतीय दूतावासातील अधिकारी कोर्टात अडचण सांगू शकतात असेही न्या. मिनल्लाह यांनी सांगितले.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: