कोंडिवरे येथे बिबट्याचा संचार , ग्रामस्थ भयभीत


प्रातिनिधिक फोटो

कोंडीवरे येथे पुन्हा बिबट्याचा संचार सुरू झाला आहे. बिबट्याने सुजीत पवार यांचे वासरू ठार मारल्याची घटना घडली. यामुळे आता शेतीचा हंगाम सुरू झाला असताना बिबट्याच्या संचारामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे.

गेल्यावर्षी ब्लॅक पँथर आणि बिबट्याचा वावर सर्रास वावर आरवली, कोंडीवरे, बुरंबाड परिसरात होत होता. याबाबत कोंडीवरे ग्रामपंचायतीच्या वतीने देवरुख येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु वन विभागाने कोणतीच कार्यवाही केली नाही. दोन महिन्यांपूर्वी कोंडीवरे केंबळेवाडीतील संतोष भुवड या शेतकऱ्याचे वासरू बिबट्याने ठार मारले. सोमवारी रात्री कोंडीवरे येथील सुजीत लक्ष्मण पवार यांचे वासरू ठार करून बिबट्याने धूम ठोकली. आठ दिवसापूर्वी या बिबट्याचे दर्शन कोंडीवरे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सायंकाळी काही ग्रामस्थांना झाले होते.

सध्या पावसाळा सुरू असताना शेतीचा हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांची गुरे सायंकाळी उशिरापर्यंत बाहेर असतात. आता पुन्हा बिबट्याचा वावर सुरू झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.





Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: