IND vs NZ WTC Final: अरे फायनल मॅच खेळतोय आणि तुझे काय चाललय; पाहा रोहित शर्माचा व्हिडिओ


साउदम्प्टन: भारतीय संघातील काही खेळाडू असे आहेत जे मैदानावर दंगा मस्ती करत असता. अशात कर्णधार विराट कोहलीचा देखील समावेश होतो. न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये देखील असेच काही पाहायला मिळाले. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विराटच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

वाचा- Video: विराटने सापळा रचला आणि शमी-गिलने मोहीम फत्ते केली

पाचव्या दिवशी देखील विराट कोहलीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात रोहित शर्माची रिअॅक्शन पाहण्यासारखी आहे.

वाचा- WTC Final ड्रॉ झाल्यास टीम इंडियाचे नुकसान; न्यूझीलंडचा होणार हा फायदा

विराट कोहली आणि रोहित शर्मा स्लिपमध्ये फिल्डिंग करत होते. चेंडू टाकल्यानंतरच्या वेळेत विराटने रोहित आणि अन्य खेळाडूंना जांभई देत काही तरी बोलला. त्यानंतर थंडीमुळे दोन्ही हात एकमेकांना घासू लागला. यावर रोहित शर्मा त्याला हाताने इशारा करत करत काही तरी बोलला. रोहित विराटला काय म्हणाला हे समजू शकले नाही. पण त्याच्या इशाऱ्यावरून असे वाटते की, अरे अरे फायनल मॅच खेळतोय आणि तुझे काय चाललय. जांभई का देतोस मॅच वर लक्ष दे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा- दोन दिवसात काय होऊ शकते WTC Final मध्ये; या ३ शक्यता आहेत

पाचव्या दिवशी न्यूझीलंडने दुसऱ्या सत्रात भारताच्या २१७ धावांच्या पुढे मजल मारली आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: