WTC FINAL : पहिल्या डावात भारतीय संघ पिछाडीवर का पडला, पाहा कोणत्या मोठ्या चुका भोवल्या…


साऊदम्पटन : फायनलच्या पहिल्या डावात भारतीय संघ पिछाडीवर पडला आहे. भारतीय संघाकडून या सामन्यात मोठ्या चुका झाल्या आणि त्याचा फटका भारतीय संघाला बसल्याचे पाहायला मिळाले.

फायनलच्या पहिल्या डावात भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्याची चांगली संधी होती. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. पण चांगली सुरुवात झाल्यावरही या दोघांनाही मोठ्या खेळी साकारता आल्या नाहीत. हे दोघे बाद झाल्यावर कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यामध्ये चांगली भागीदारी झाली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी जेव्हा खेळ संपला तेव्हा भारताला मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. पण तिसऱ्या दिवशी एकही धाव न करता कोहली ४४ धावांवर बाद झाला आणि याचा फटका भारतीय संघालाही बसला. कोहली बाद झाल्यावर अजिंक्य रहाणे हा चांगली फलंदाजी करत होता. अजिंक्यला अर्धशतकासाठी फक्त एका धावेची गरज होती. त्यावेळी अजिंक्य चुकीचा फटका खेळला आणि त्याला फटका त्याला बसला. त्यामुळे अजिंक्यचे अर्धशतक यावेळी फक्त एका धावेने हुकले, त्याचबरोबर भारतीय संघाच्या मोठी धावसंख्या करण्याचे स्वप्नही भंग पावले.


भारताने पहिल्या डावात २१७ धावा केल्या. पण हे आव्हान राखण्यासाठी त्यांनी चांगल्या गोलंदाजीचा वापर केला नाही. कोहलीने यावेळी नेतृत्व करताना मोठी चुक केली. कोहलीने नवीन चेंडू हा मोहम्मद शमीला द्यायला हवा होता. कोहलीने तिसऱ्या आणि पाचव्या दिवशीही शमीला सुरुवातीला गोलंदाजीची संधी दिली नाही आणि हीच गोष्ट भारतीय संघाला चांगलीच भोवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे न्यूझीलंडचे सलामीवीर चांगली भागीदारी रचू शकले आणि त्यांनी न्यूझीलंडच्या आघाडीचा चांगला पाया रचला. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवेने अर्धशतक झळकावले, पण पहिल्या डावात भारताच्या एकाही फलंदाजाला ही किमया साधता आली नाही. त्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांमध्ये भारताकडून चुका घडल्या आणि त्याचाच फटका आता त्यांना बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता दुसऱ्या डावात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: